CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 09:33 AM2020-05-13T09:33:34+5:302020-05-13T09:40:43+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: सोशल डिस्टंसिंग आणि इतर उपायांच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान एक घटना समोर आली आहे. एका कार्यक्रमात सर्वांसमोर मंत्री शिंकले अन् सगळेच घाबरल्याची घटना तेलंगणामध्ये घडली आहे.
हैदराबाद - कोरोनाच्या नियंत्रणासाठी देशात युद्धपातळीवर यंत्रणा कामाला लागली असून सर्व राज्यांमध्ये संशयितांची माहिती घेण्याबरोबर तपासणी, क्वॉरंटाईन सुरू केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांकडूनही शासनाला सहकार्य करण्यात येत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या झपाटयाने वाढत असल्याने लोकांमध्येही याबाबत प्रचंड भीती निर्माण झाली आहे. सोशल डिस्टंसिंग आणि इतर उपायांच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान एक घटना समोर आली आहे. एका कार्यक्रमात सर्वांसमोर मंत्री शिंकले अन् सगळेच घाबरल्याची घटना तेलंगणामध्ये घडली आहे.
तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव यांना कार्यक्रमादरम्यान सलग शिंका आल्या. त्यामुळे जनतेमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केटी रामाराव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र आहेत. ते सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्रीय समितीचे कार्यकारी अध्यक्ष आणि राज्यातील आयटीमंत्रीदेखील आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये केटी रामाराव हे तोंडावर रुमाल ठेवून सलग शिंकत आहेत. लॉकडाऊनदरम्यान ते राज्यातील विविध भागांना भेट देत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांची तब्येत थोडी बरी नव्हती.
Many thanks for your concern sir. Perfectly well now 👍
— KTR (@KTRTRS) May 12, 2020
Developed an allergic cold (struggling for many years) en route to Siricilla. Didn’t want to cancel my visit suddenly as it would inconvenience many people
Apologies for any inconvenience I may have caused inadvertently🙏 https://t.co/wkiPK3JUcb
मंत्र्यांचा शिंकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर जनतेने त्याची विचारपूस केली आहे. तसेच काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर त्यांना जनतेकडून सातत्याने स्वत:ची काळजी घ्या संदेश दिला जात आहेत. 'केटीआर सर. तुमच्याच फ्लूची लक्षणे आहे हे ऐकून चिंतेत आहे. तुम्ही कोरोना वॉरियर आहात. कृपया आपल्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही आमचा विश्वास आहात. काळजी घ्या' असं ट्विट एका व्यक्तीने केलं आहे. त्याला केटीआर यांनी उत्तर दिलं आहे. 'मी ठीक आहे. मला एलर्जीमुळे सर्दी झाली होती. मात्र मी माझा प्रवास थांबवू इच्छित नाही. माझ्यामुळे काहींना त्रास झाला. यासाठी मी माफी मागतो' असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय https://t.co/K60XaNQq8m#CoronaUpdatesInIndia#PregnantWoman#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 13, 2020
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेलhttps://t.co/Arqtj0BgBB#CoronaUpdatesInIndia#COVID19India#healthtips
— Lokmat (@MiLOKMAT) May 12, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! 'या' शहरात 'कॅश ऑन डिलिव्हरी'वर बंदी
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; कोट्यवधी लोकांना होणार फायदा
लॉकडाऊननंतर इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल-डिझेल महागणार?; 'हे' आहे कारण
CoronaVirus News : होम क्वारंटाईन कधी संपणार?; आरोग्य मंत्रालयाकडून नियमात मोठा बदल