CoronaVirus News: दिलासादायक; "फ्लॅट नव्हे, लवकरच रिव्हर्स येईल 'कोरोना ग्राफ', आता 'स्वदेशी' टेस्टिंग किट्सने होणार तपासणी"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 08:09 PM2020-05-09T20:09:38+5:302020-05-09T20:25:07+5:30
नवी दिल्ली : मे महिन्यात कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ देशासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र, अशातच आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन ...
नवी दिल्ली : मे महिन्यात कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ देशासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र, अशातच आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केकेले विधान दिलासादायक आहे. त्यांनी एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटले आहे, की काही आठवड्यांतच कोरोनाचा ग्राफ केवळ फ्लॅटच नाही, तर रिव्हर्सदेखील येईल. ते म्हणाले, अधिक तपासण्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये झालेली वाढ, यामुळे सध्या अधिक रुग्ण समोर येत आहेत.
आरोग्य मंत्री म्हणाले, 'आतापर्यंत देशात जवळपास 56 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 1800 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 17 हजार लोग ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. आपला रिकव्हरी रेट 30 टक्के एवढा आहे. तर लोकसंख्या एकूण 135 कोटी आहे. आपल्याहून छोट्या देशांतही आपल्यापेक्षा अधिक रुग्ण आणि मृत्यू झाले आहेत. जगाच्या तुलनेत भारत फार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. लोकही सरकारच्या सूचनांचे पालन करत आहेत.'
डॉ. गुलेरिया यांच्या वक्तव्यावर काय म्हणाले डॉ. हर्षवर्धन?
AIIMSचे संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले होते, की जून-जुलैमध्ये कोरोना बाधितांची संख्या पीकवर असू शकते. यावर हर्षवर्धन म्हणाले, 'माझी कसल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. त्यांनी काय विचार करून हे वक्तव्य केले, मला माहित नाही. मात्र, वैयक्तीक पातळीवर, मी म्हणू शकतो, की मी, आशावादी आहे. येणाऱ्या काही आठवड्यांत हळू-हळू पूर्णपणे फ्लॅट होईल आणि रिव्हर्सदेखील होईल. आपला कोरोनाविरोधातील लढाईत निश्चितपणे निर्णायक विजय होईल.'
आणखी वाचा - CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका
आता 'चीनी' नव्हे 'स्वदेशी' टेस्ट किट्सचा होणार वापर -
हर्षवर्धन म्हणाले, आज एका लॅबच्या 452 लॅब झाल्या आहेत. 80 हजारवर टेस्ट रोज केल्या जात आहेत. आम्ही 31 मेपर्यंत 1 लाख टेस्ट करणार असल्याचे म्हटले होते. आपण टेस्टिंगच्या बाबतीतही जगातील कुठल्याही देशापेक्षा मागे नाही. आज देशातील प्रत्येक जिल्ह्यात टेस्ट होत आहे. कर्नाटकात प्रत्येक जिल्ह्यात 250 टेस्ट करायला लावल्या आहेत. मात्र, त्यांनी 7-8 हजारपर्यंत टेस्ट केल्या आहेत. या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. तर काही लोकांचा टेस्ट रिपोर्ट उशिराने येत आहे. ही समस्याही दूर होईल. आनंदाची गोष्ट तर ही आहे, की आपले वैज्ञानिक मे महिन्यातच अँटीबॉडी टेस्ट किट्स आणि आरटी-पीसीआर टेस्ट किट्स भारतात तयार करण्यास प्रारंभ करतील. येणाऱ्या काळात याच किट्सचा वापर केला जाईल. अनेक ठिकाणी व्हॅक्सीन शोधण्याचे काम सुरू आहे. तसेच काही ह्यूमन ट्रायलपर्यंतही पोहोचे आहे, असेही हर्षवर्धन यांनी सांगितले.
आणखी वाचा - 40 कुटुंबांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश; पूर्वजांना औरंगजेबाने मुस्लीम बनवल्याचा दावा