CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाग्रस्ताला रुग्णालयानं दिलं भलं मोठं बिल, आकडा पाहून तुम्ही व्हाल हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 01:35 PM2020-06-10T13:35:14+5:302020-06-10T13:49:12+5:30

देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र कधी कधी रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर येत आहे.

CoronaVirus Marathi News surat corona patient private hospital bill 12 lacs | CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाग्रस्ताला रुग्णालयानं दिलं भलं मोठं बिल, आकडा पाहून तुम्ही व्हाल हैराण!

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाग्रस्ताला रुग्णालयानं दिलं भलं मोठं बिल, आकडा पाहून तुम्ही व्हाल हैराण!

Next

कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच काही धक्कादायक घटना समोर येत आहेत.

देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र कधी कधी रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर येत आहे. याच दरम्यान काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे. तसेच रुग्णांना उपचारानंतर भलं मोठं बिल देण्यात येत आहे. गुजरातच्या सूरतमधील एका रुग्णालयाने कोरोनाग्रस्ताकडून तब्बल 12 लाखांचं बिल वसूल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सूरतच्या झापा बाजार परिसरात राहणाऱ्या 50 वर्षीय गुलाम हैदर शेख यांना 13 मे रोजी सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाला. कुटुंबीयांनी उपचारासाठी त्यांना जवळच्या डॉक्टर नेलं. मात्र कोरोनाची लक्षण आढळून आल्याने त्यांना सूरतमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती आणखी बिघडली. गुलाम हैदर शेख यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं. त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र त्यानंतर 48 तासांत त्यांचा दुसरा रिपोर्ट  निगेटिव्ह आला.

गुलाम हैदर शेख यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं. मात्र या दरम्यान कुटुंबीयांना शेख यांची भेट घेता आली नाही. त्यांचं फक्त फोनवर बोलणं व्हायचं. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तब्बल 14 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. बरे झाल्यावर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्यावेळी रुग्णालयाने दिलेलं बिल पाहून कुटुंबीय सर्वच जण हैराण झाले. गुलाम हैदर शेख यांच्याकडून रुग्णालयाने 12.23 लाखांचं बिल वसूल केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

बापरे! पृथ्वीच्या दिशेने येतंय आणखी एक नवं संकट; नासानं दिला इशारा

CoronaVirus News : शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'हा' फॉर्म्युला लागू होणार?

CoronaVirus News : धोका वाढला! एप्रिलमध्ये कोरोनामुक्त झालेल्या 'या' 5 राज्यांमध्ये व्हायरसचा पुन्हा शिरकाव

इलेक्ट्रिक टूथब्रश आला! एका चार्जिंगमध्ये महिनाभर दात घासणार

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लोकांनी घेतला आवडीच्या पदार्थांचा आस्वाद, LPG विक्रीत कमालीची वाढ

 

Web Title: CoronaVirus Marathi News surat corona patient private hospital bill 12 lacs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.