CoronaVirus News : भयंकर! आधी जिवंत व्यक्तीला केलं मृत घोषित, कुटुंबाला सोपवला भलताच मृतदेह पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 01:21 PM2020-05-27T13:21:04+5:302020-05-27T13:22:24+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत  वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. याच दरम्यान काही धक्कादायक घटना समोर येत आहेत.

CoronaVirus Marathi News surviving young dead sent anothers deadbody home SSS | CoronaVirus News : भयंकर! आधी जिवंत व्यक्तीला केलं मृत घोषित, कुटुंबाला सोपवला भलताच मृतदेह पण...

CoronaVirus News : भयंकर! आधी जिवंत व्यक्तीला केलं मृत घोषित, कुटुंबाला सोपवला भलताच मृतदेह पण...

Next

लखनऊ - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक देश कोरोना संकटाचा सामना करत आहेत. काही देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत  वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. याच दरम्यान काही धक्कादायक घटना समोर येत आहेत.

उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगरमध्ये अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा प्रकार समोर आला आहे. आधी जिवंत व्यक्तीला मृत घोषित केलं त्यानंतर कुटुंबाला भलताच मृतदेह सोपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. एका कुटुंबाला कोरोनामुळे घरातील सदस्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच त्यानंतर मृतदेहही पाठवण्यात आला. घरामध्ये अंत्यसंस्काराची सर्व तयारी करण्यात आली. नातेवाईक देखील जमा झाले. त्यावेळी वृद्ध पित्याने आपल्या मृत तरुण मुलाचा मृतदेह पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मृतदेहावरचा कपडा काढल्यानंतर हा मृतदेह आपल्या व्यक्तीचा नसल्याचा प्रकार समोर आला आणि सर्वांनाच धक्का बसला.

मथुरापूर गावातील रहिवासी असलेले दोन तरूण काही दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी राहण्यासाठी आले होते. मात्र त्यापैकी एकाला ताप आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिकाऱ्यांनी मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांना दिल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्याचा मृतदेहही घरी पाठवण्यात आला. कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याआधी तरुणाच्या वडिलांना आणि तीन भावांना पीपीई किटही उपलब्ध करून देण्यात आलं. वडिलांनी तरुण मुलाचा चेहरा अखेरचं पाहून घेण्यासाठी बॅगचं सील तोडलं आणि मृतदेहाचा चेहरा पाहिला तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण हा त्यांच्या मुलाचा मृतदेह नसून दुसऱ्याच व्यक्तीचा होता. तर त्यांचा मुलगा जिवंत होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Video - 'अम्फान'नंतर दोन गटांमध्ये जोरदार राडा, तुफान हाणामारी; पोलीस आले अन्...

CoronaVirus News : 'रेल्वेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार करण्याचा प्रयत्न', 'या' सरकारचा गंभीर आरोप

CoronaVirus News : दिलासादायक! देश कोरोनाची लढाई जिंकणार, 'हा' नवा फॉर्म्युला फायदेशीर ठरणार?

CoronaVirus News : शाळा-कॉलेज कधी सुरू होणार?; केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलं उत्तर

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासात एकाच दिवशी 7 मजुरांचा मृत्यू; कारण वाचून व्हाल हैराण

CoronaVirus News : धक्कादायक! खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह

Web Title: CoronaVirus Marathi News surviving young dead sent anothers deadbody home SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.