CoronaVirus News : होम क्वारंटाईन कधी संपणार?; आरोग्य मंत्रालयाकडून नियमात मोठा बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 04:31 PM2020-05-11T16:31:40+5:302020-05-11T16:42:29+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सर्वच राज्य कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहेत तर अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 17 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 67152 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2206 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. होम क्वारंटाईन संदर्भात सोमवारी (11 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना (गाईडलाईन्स) जारी केल्या आहेत. होम क्वारंटाईनसंबंधित आरोग्य मंत्रालयाकडून नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर घरातच क्वारंटाईन ठेवण्यात आलेले लोक हे होम क्वारंटाईनमधून केव्हा बाहेर येऊ शकतात हे स्पष्ट करण्यात आले आहे.
The Ministry of Health & Family Welfare has issued revised guidelines for home isolation of very mild/pre-symptomatic #COVID19 cases pic.twitter.com/hTPcGRBqxd
— ANI (@ANI) May 11, 2020
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार. ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत असे रुग्ण लक्षणे दिसल्यापासून 17 दिवसांनंतर होम क्वारंटाईन बाहेर येऊ शकतात अथवा ते संपवू शकतात. मात्र या 17 दिवसांच्या काळात सलग 10 दिवस अशा रुग्णाला ताप आलेला नसावा. तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना 17 दिवसांनंतर कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचं देखील यामध्ये म्हटलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! सोपा नसणार रेल्वेप्रवास, 'या' गोष्टी जाणून घ्याhttps://t.co/UNtdgEqCsv#coronavirusinindia#Railway
— Lokmat (@MiLOKMAT) May 11, 2020
रुग्णांनी आपल्या आरोग्याची माहिती ही नियमितपणे जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्याला द्यावी असं देखील मार्गदर्शक सुचनांमध्ये म्हटलं आहे. तसेच Hydroxychloroquine हे औषध सध्या कोरोनावर प्रभावी ठरत आहे. मात्र आरोग्य अधिकारी अथवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं देखील गरजेचं आहे. आरोग्य सेतू हे कॉम्प्रिहेन्सीव्ह कोविड-19 ट्रॅकिंग अॅप आहे. कोरोनाविरोधातील लढाईत लोकांना आरोग्य सेवांशी जोडणे आणि सर्वसामान्यांमध्ये सुरक्षितता निर्माण करणे हा या अॅपचा मुख्य उद्देश आहे. तसेच आरोग्य सेतू अॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचा वापर करतं. या अॅपच्या मदतीने रुग्णांनी त्यांना काही त्रास झाल्यास त्याबाबत त्वरीत माहिती द्यायची आहे. याद्वारे त्यांना लगेचच वैद्यकीय मदत केली जाईल.
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारीhttps://t.co/pjdGv5umYj#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID2019india
— Lokmat (@MiLOKMAT) May 11, 2020
CoronaVirus News : 'आरोग्य सेतू मित्र' वेबसाईट लाँच; घरबसल्या मिळणार वैद्यकीय सुविधा
आरोग्य सेतू अॅपद्वारे शासनाकडे नोंद असलेला कोरोनाग्रस्त व्यक्तीजवळ आल्यास हे अॅप ट्रॅक करणार आहे. सहा फूट अंतरापर्यंत हे अॅप ‘त्या’ व्यक्तीला ट्रॅक करू शकतं. आरोग्य सेतू अॅपनंतर आता नीती आयोगाने 'आरोग्य सेतू मित्र' (AarogyaSetu Mitr) ही नवी वेबसाईट लाँच केली आहे. नव्या वेबसाईटद्वारे घरबसल्या लोकांना डॉक्टरांचा सल्ला आणि वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. आरोग्य सेवा पुरवणे हा यामागचा उद्देश आहे. आरोग्य सेतू मित्रने ई-संजिवनी ओपीडी, स्वस्थ, स्टेपवन, टाटा हेल्थ आणि टेक महिंद्राच्या कनेक्टसेन्स टेलीहेल्थसोबत भागीदारी केली आहे. वेबसाईटवरून लोकांना ऑडिओ कॉल, मेसेज, चॅट आणि व्हिडीओ कॉलवरून कोविड-19 व्हायरस संदर्भातील आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहे.
CoronaVirus News : लय भारी! 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने फोन, नोटा करा सॅनिटाईजhttps://t.co/COdJ4Um5cI#coronavirus#technology
— Lokmat (@MiLOKMAT) May 11, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : 'सोनिया गांधींनी तुमच्या तिकिटाचे पैसे दिलेत'; काँग्रेस आमदाराने वाटली पत्रकं
CoronaVirus News : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! सोपा नसणार रेल्वेप्रवास, 'या' गोष्टी जाणून घ्या
CoronaVirus News : लय भारी! 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने फोन, नोटा करा सॅनिटाईज
CoronaVirus News : धक्कादायक! २४ तासांत राज्यभरात २२१ पोलिसांना कोरोनाची बाधा