CoronaVirus News : काय सांगता? 'या' रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी TikTok थेरपी; डॉक्टरच देतात चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 10:27 AM2020-06-23T10:27:48+5:302020-06-23T10:32:40+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील एका रुग्णालयात तर चक्क TikTok थेरपीचा वापर केला जात असल्याची माहिती आता समोर आली आहे.

CoronaVirus Marathi News tiktok therapy mizoram covid centre for patients | CoronaVirus News : काय सांगता? 'या' रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी TikTok थेरपी; डॉक्टरच देतात चॅलेंज

CoronaVirus News : काय सांगता? 'या' रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी TikTok थेरपी; डॉक्टरच देतात चॅलेंज

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या तब्बल चार लाख 40 हजारांवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 14933 नवे रुग्ण आढळले आहेत. तर  312 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस  किंवा औषध उपलब्ध झालेलं नाही. यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्याने विविध थेरपीचा वापर करण्यात येत आहे. देशातील एका रुग्णालयात तर चक्क TikTok थेरपीचा वापर केला जात असल्याची माहिती आता समोर आली आहे. 

मिझोरमच्या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी खास TikTok थेरपीचा वापर करण्यात येत आहे. तसेच यामध्ये डॉक्टरच रुग्णांना विविध चॅलेंज देत आहेत. या थेरपीचा कोरोना रुग्णांसोबत डॉक्टरांनीही फायदा  होत आहे. Tik Tokच्या माध्यमातून रुग्णांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मिझोरमच्या लाँगतलाई जिल्ह्यातल्या एका कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांनी हा प्रयोग केला. त्याचा परिणाम चांगला आल्याने डॉक्टरांचाही उत्साह वाढला आहे. 

Tik Tok थेरपीमुळे कोविड सेंटरमधील रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांचं मनोबल उचावण्यास मदत होत आहे. या केअर सेंटरवर डॉक्टरांनी एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्यात सेंटरची संबंधीत सर्व कर्मचारी तर असतातच त्याचबरोबर रुग्णांचाही त्यात समावेश केला जातो. डॉक्टरांचा डान्स करतानाचा व्हिडीओ रुग्णांना दिसला आणि या थेरपीची सुरुवात झाली. ज्या रुग्णांना फार लक्षणे नाहीत अशांना डॉक्टरांनी डान्सचं चॅलेंज दिलं.

मजेदार चॅलेंजमुळे रुग्णांना देखील विरंगुळा मिळाला. त्यांचा ताण हलका झाला आणि प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं दिसून आलं. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पतंजली मंगळवारी (23 जून) कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं 'कोरोनिल' जगासमोर आणणार आहे. आचार्य बालकृष्ण हे आज दुपारी 12 वाजता हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध 'कोरोनिल' लाँच करणार आहेत. रामदेव बाबाही यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. आचार्य बालकृष्ण यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. गिलॉय आणि अश्वगंधाच्या मदतीने कोरोनावर खात्रीने उपचार होऊ शकतो, असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : पतंजलीचं पहिलं कोरोना आयुर्वेदिक औषध तयार! रामदेव बाबा आज करणार लाँच

CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोना हरणार, देश जिंकणार; 'ही' तीन औषधं व्हायरसला टक्कर देणार

India China Faceoff : भारताला लुबाडण्यासाठी चीनची 'नवी चाल'; 'या' आवश्यक वस्तूंचे वाढणार भाव 

ही दोस्ती तुटायची नाय! मधमाश्यांचा भन्नाट मित्र पाहिलात का?; Video पाहून हैराण व्हाल 

चहा विक्रेत्याच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी, फ्लाईंग ऑफिसर होऊन नेत्रदीपक भरारी

 

Web Title: CoronaVirus Marathi News tiktok therapy mizoram covid centre for patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.