CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! फक्त तीन दिवसांत देशात 1 लाख नवे रुग्ण; धडकी भरवणारा ग्राफ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 10:21 AM2020-07-24T10:21:13+5:302020-07-24T10:26:00+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांच्या 11 लाखांवर असलेल्या संख्येने केवळ तीन दिवसांत 12 लाखांचा टप्पा पार केला आहे. 

CoronaVirus Marathi News Total COVID19 positive cases India stand 12,87,945 | CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! फक्त तीन दिवसांत देशात 1 लाख नवे रुग्ण; धडकी भरवणारा ग्राफ

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! फक्त तीन दिवसांत देशात 1 लाख नवे रुग्ण; धडकी भरवणारा ग्राफ

Next

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा विस्फोट झालेला पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल एक कोटीवर गेली आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत अकराव्या व नंतर नवव्या स्थानी असलेला भारत आता तिसऱ्या स्थानी आला आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. फक्त तीन दिवसांत देशात 1 लाख नवे रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना रुग्णांच्या 11 लाखांवर असलेल्या संख्येने केवळ तीन दिवसांत 12 लाखांचा टप्पा पार केला आहे. 

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढतच आहे. देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 49,310 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 740 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तब्बल 12 लाखांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (24 जुलै) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 49,310 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 12 लाख 87 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 30,601  वर पोहोचला आहे.  

देशात कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण 63.18 टक्के आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,40,135 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 8,17,209 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोना संकटातील भयानक वास्तव! 50 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार, सरकारने दिलं 'हे' कारण

CoronaVirus News : बापरे! ताज्या हवेसाठी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्ताला ICUतून बाहेर आणलं अन्...

CoronaVirus News : धक्कादायक! उपचारासाठी तीन रुग्णालयांनी दिला नकार, कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू

"देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न", राहुल गांधीचा घणाघात

चिंता वाढली! कोरोना पाठोपाठ देशावर येतंय आणखी एक मोठं संकट

CoronaVirus News : बापरे! परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी

CoronaVirus News : भयंकर! कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर कुटुंबाने पेटवून दिली रुग्णवाहिका

Web Title: CoronaVirus Marathi News Total COVID19 positive cases India stand 12,87,945

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.