CoronaVirus News : चिंताजनक! गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 33610 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 06:28 PM2020-04-30T18:28:41+5:302020-04-30T18:35:39+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन यासारखे खबरदारीचे उपाय घेतले जात आहे.
नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 30 लाखांच्यावर गेली असून लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. भारतासह जगातील अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन यासारखे खबरदारीचे उपाय घेतले जात आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही वेगाने वाढत आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 33 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 33 हजार 610 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1075 जणांचा मृत्यू झाला आहे. 24162 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 8373 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (30 एप्रिल) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 67 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 1823 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत.
1823 new cases and 67 deaths reported in the last 24 hours
— ANI (@ANI) April 30, 2020
The total number of COVID19 positive cases in India rises to 33610 including 24162 active cases, 8373 cured, discharged, migrated and 1075 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/G0RbjT1ONT
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 228,884 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 32 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 3,241,495 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 1,010,962 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत.
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये जोडप्याने लढवली शक्कल, बाहुलीला बनवलं आजारी बाळ अन्https://t.co/c3gvetqIbQ#CoronaUpdatesInIndia#coronalockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 30, 2020
CoronaVirus News : लॉकडाऊननंतर बदलणार मेट्रोचा प्रवास, 'ही' सेवा होऊ शकते बंदhttps://t.co/67xi2lGdpF#CoronaUpdatesInIndia#CoronaLockdown#Metro
— Lokmat (@MiLOKMAT) April 30, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये जोडप्याने लढवली शक्कल, बाहुलीला बनवलं आजारी बाळ अन्
CoronaVirus News : धक्कादायक! पत्नीला कोरोना झाल्यामुळे पतीची आत्महत्या
CoronaVirus News : लॉकडाऊननंतर बदलणार मेट्रोचा प्रवास, 'ही' सेवा होऊ शकते बंद
CoronaVirus News : "...तर कोरोनाऐवजी लॉकडाऊनमुळे जास्त लोकांचा मृत्यू होईल"
Rishi Kapoor passed away : "एक एव्हरग्रीन पर्सनॅलिटी, ते आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणं कठीण"