CoronaVirus News : धोका वाढला! नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 70 हजार पार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 11:29 AM2020-05-12T11:29:42+5:302020-05-12T11:35:37+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन सुरू आहे.
नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 3604 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या ही 70 हजारांच्या वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे देशात 2293 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
मंगळवारी (12 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3604 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 70756 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2200 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 46008 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 22454 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून देशभरात तब्बल 4213 नवे कोरोना बाधित आढळून आले होते. चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.
Spike of 3604 #COVID19 cases in the last 24 hours; total positive cases in the country is now at 70756, including 46008 active cases, 22454 cured/discharged/migrated cases and 2293 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/0xm42EjP6Z
— ANI (@ANI) May 12, 2020
देशातील पाच राज्ये आणि सहा शहरांतच कोरोना विषाणूचे (कोविड-19) 80 टक्के रुग्ण आहेत. केंद्र सरकार याच राज्यांवर लक्ष केंद्रीत करून कोरोना वेगाने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. केरळ मॉडेलचा अवलंब करून कोविड-19 विरोधातील युद्ध जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू आणि राजस्थानात सर्वात जास्त रुग्ण आहेत. शहरांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, सूरत, अहमदाबाद, बडोदा, इंदूर, जयपूर, चेन्नई, आग्रा, हैदराबाद, कोलकाता आदींचा समावेश आहे. ही राज्ये व या शहरांत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या तुकड्या पाठवल्या आहेत.
CoronaVirus News : सर्वसामान्यांना दिलासा! कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; कोट्यवधी लोकांना होणार फायदाhttps://t.co/EQVUJ3xYKK#coronaupdatesindia#RationCards
— Lokmat (@MiLOKMAT) May 12, 2020
होम क्वारंटाईन संदर्भात सोमवारी (11 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना (गाईडलाईन्स) जारी केल्या आहेत. होम क्वारंटाईनसंबंधित आरोग्य मंत्रालयाकडून नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर घरातच क्वारंटाईन ठेवण्यात आलेले लोक हे होम क्वारंटाईनमधून केव्हा बाहेर येऊ शकतात हे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार. ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत असे रुग्ण लक्षणे दिसल्यापासून 17 दिवसांनंतर होम क्वारंटाईन बाहेर येऊ शकतात अथवा ते संपवू शकतात. मात्र या 17 दिवसांच्या काळात सलग 10 दिवस अशा रुग्णाला ताप आलेला नसावा. तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना 17 दिवसांनंतर कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचं देखील यामध्ये म्हटलं आहे.
लॉकडाऊननंतर इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल-डिझेल महागणार?; 'हे' आहे कारणhttps://t.co/yjl8J3nPnw#Fuel#petrolpricehike
— Lokmat (@MiLOKMAT) May 12, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; कोट्यवधी लोकांना होणार फायदा
लॉकडाऊननंतर इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल-डिझेल महागणार?; 'हे' आहे कारण
CoronaVirus News : "कोरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचे शोषण नको"
CoronaVirus News : होम क्वारंटाईन कधी संपणार?; आरोग्य मंत्रालयाकडून नियमात मोठा बदल