CoronaVirus News : नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली, कोरोनाग्रस्तांचा आकडा 81 हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 11:00 AM2020-05-15T11:00:12+5:302020-05-15T11:02:22+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असून ती 45 लाखांच्या वर गेली आहे.
नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देश हे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. जगातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असून ती 45 लाखांच्या वर गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 303,405 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे देशातील परिस्थितीही चिंताजनक होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 81 हजारांवर गेला आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 3967 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 100 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 81,970 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2649 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी (15 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 3967 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 81,970 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2649 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 51401 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 27920 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
Spike of 3967 #COVID19 cases & 100 deaths in India, in last 24 hours. Total positive cases in the country is now at 81970, including 51401 active cases, 27920 cured/discharged/migrated cases and 2649 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/63yDyjOXBI
— ANI (@ANI) May 15, 2020
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकाडाऊनला पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि अन्य अधिकृत सूत्रांच्या विश्लेषक माहितीनुसार भारतातील कोरोनाचा आलेख सपाट होत असल्याचे दिसते. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर, तर मृत्यू दर आणि रुग्णाचे प्रमाण दुप्पट होण्याचा अवधीही कमालीचा वाढल्याने या आकडेवारीने आशा पल्लवित झाल्या आहेत.
CoronaVirus News : अमेरिकेने केला चीनवर गंभीर आरोप; सांगितलं कोरोना पसरण्यामागचं कारणhttps://t.co/22WgfnaPHd#coronavirus#America#China
— Lokmat (@MiLOKMAT) May 15, 2020
उपरोक्त अधिकृत सूत्रांच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर गुरुवारी 33.6 टक्क्यांवर गेला असून, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. एवढेच नाही तर, कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही 3.3 टक्क्यांवरून 3.2 टक्क्यांवर आले आहे. रुग्ण दुप्पट होण्याच्या दरावधीतही गेल्या तीन दिवसांत लक्षणीय वाढ (12.2) झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसांत रुग्णसंख्या वाढीचा सरासरी दरही 5.5 टक्क्यांवर घसरला आहे.
CoronaVirus News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिल गेट्स यांच्याशी खास चर्चा; म्हणाले...https://t.co/E2CR3kG3EF#CoronaUpdatesInIndia#BillGates#NarendraModi
— Lokmat (@MiLOKMAT) May 15, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : अमेरिकेने केला चीनवर गंभीर आरोप; सांगितलं कोरोना पसरण्यामागचं कारण
CoronaVirus News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिल गेट्स यांच्याशी खास चर्चा; म्हणाले...
CoronaVirus News : टाईम्स स्क्वेअरवर लागलं 'ट्रम्प डेथ क्लॉक'; 'हे' आहे कारण
CoronaVirus News : भुकेसाठी काय पण! बिस्किटांवरून मजुरांचा स्टेशनवर राडा; Video व्हायरल
CoronaVirus News : 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वाचून तुम्हीही म्हणाल लय भारी!
CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! 1500 भारतीयांवर WHO 'या' औषधांची चाचणी करणार
CoronaVirus News : लॉकडाऊनचा असाही फायदा; 40 वर्षांत जे झालं नाही ते घडलं, तुम्हीही म्हणाल अरे व्वा!