CoronaVirus News : कोरोनाचा फटका! लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 09:44 PM2020-05-05T21:44:20+5:302020-05-05T21:53:07+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच दुसरीकडे कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत.
नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अमेरिका, इटली, स्पेनसारख्या देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच दुसरीकडे कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. अनेकांना रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसला आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले आहेत. याच दरम्यान बेरोजगारीची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशातील बेरोजगारीचा दर हा 27.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये 3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील बेरोजगारीचा दर 27.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा छोटे व्यावसायिक आणि मजुरांना बसला आहे. महिनाभरात 12 कोटींपेक्षा अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
CMIE ने दिलेल्या माहितीनुसार, छोटे व्यावसायिक, फेरीवाले, बांधकाम मजूर, हाताने रिक्षा ओढणारे, हमाल अशी दैनंदिन कमाई करणाऱ्या मजुरांचा रोजगार हा लॉकडाऊनमुळे गेला आहे. तसेच नोकरी गमावणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. तर दुसरीकडे नोकरी शोधणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याआधी आलेल्या सर्व्हे रिपोर्टनुसार, एप्रिल 2020 मध्ये देशातील बेरोजगारीचे प्रमाण 23.5 टक्क्यांवर पोहोचले. फक्त एप्रिलमध्येच बेरोजगारीचा दर 14.8 टक्क्यांनी वाढला होता. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : लग्नासाठी 50 तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी, जाणून घ्या गृहमंत्रालयाचे 'हे' नियम https://t.co/qTsEmQPPvn#coronavirusinindia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 5, 2020
संपूर्ण जगात थैमान घालत असलेल्या कोरोनाचा फैलाव देशातही वेगाने होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश उद्योगधंदे बंद असून, त्याचा विपरीत परिणाम रोजगारनिर्मितीवर झाला आहे. रोजगार आणि रोजंदारीवर विपरीत परिणाम झाला आहे. लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. त्याचं अर्थव्यवस्थेतलं योगदान मोठं आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका या उद्योगांना बसला आहे.
CoronaVirus News : Hydroxychloroquine की Remdesivir... कोरोनावर कोणतं औषध प्रभावी?, तज्ज्ञ म्हणतात...https://t.co/s9vKOiF6H0#coronaupdatesindia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 5, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 2,52,675 जणांचा मृत्यू; अमेरिकेत परिस्थिती गंभीर
CoronaVirus News : "...हे तर आमच्याकडून देशासाठी केलेलं दान", मद्यप्रेमीचा 'हा' Video व्हायरल
CoronaVirus News : खोकल्याचं औषध घेत असाल तर वेळीच व्हा सावध, वाढू शकतो कोरोनाचा धोका?