CoronaVirus News : 'पापड खाओ, कोरोना भगाओ' म्हणणारे मोदींचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 11:25 AM2020-08-09T11:25:52+5:302020-08-09T11:35:46+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

CoronaVirus Marathi News union minister arjun meghwal tested corona positive | CoronaVirus News : 'पापड खाओ, कोरोना भगाओ' म्हणणारे मोदींचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus News : 'पापड खाओ, कोरोना भगाओ' म्हणणारे मोदींचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

googlenewsNext

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून रुग्णांचा आकडा हा तब्बल 21,53,011 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे  64,399 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 861 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 43,379 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिग बी अमिताभ बच्चन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याच दरम्यान मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

'पापड खाओ, कोरोना भगाओ' असा सल्ला देणारे मंत्रीच कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. मेघवाल यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अर्जुन मेघवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 'माझी चाचणी पॉझिटिव्ह आली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. जे लोक गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या असं त्यांनी' म्हटलं आहे. 

मोदी सरकारमधील संसदीय कार्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हे काही दिवसांपूर्वी आपल्या अजब विधानामुळे चर्चेत आले होते. मेघवाल हे एका पापडामुळे वादात अडकले होते. पापड खाल्ल्याने कोरोना व्हायरस ठीक होईल, असा दावा त्यांनी व्हिडीओतून केला होता. अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते एका प्रायव्हेट कंपनीचा पापड लॉन्च करण्यात आला. हा पापड लॉन्च करतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  

"या पापडाने कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक अँटीबॉडीज विकसित होतील" असा दावा मेघवाल यांनी केला होता. एवढेच नाही, तर "आत्मानिर्भर भारतअंतर्गत, एका उद्योजकाने ‘भाभीजी पापड’ नावाने पापड तयार केले आहेत. हे कोरोना व्हायरसचा सामना करण्यात अत्यंत उपयोगी ठरतील. त्यांना माझ्या शुभेच्छा आणि मला आशा आहे, की ते यशस्वी होतील" असंही मेघवाल यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर आता मेघवाल यांनाच कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

आत्मनिर्भर भारत! 101 संरक्षण उत्पादनांवर आयात बंदी; राजनाथ सिंहांची मोठी घोषणा

"देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या"

Breaking: विजयवाडामध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

Google ने चीनला दिला जबरदस्त दणका; तब्बल 2500 यूट्यूब चॅनल केले डिलीट

Air India Plane Crash : अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, जखमींना 2 लाखांची मदत

माणुसकीला काळीमा! रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला बेदम मारहाण, Video व्हायरल

Web Title: CoronaVirus Marathi News union minister arjun meghwal tested corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.