CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! 14 मृतदेहांचा 'तो' धक्कादायक Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 10:43 AM2020-06-12T10:43:40+5:302020-06-12T10:49:12+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यावर अनेक ठिकाणी नातेवाईकांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवल्याच्या घटना घडत आहेत. रुग्णालयात मृतदेह पडून राहीले आहे.
कोलकाता - भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला आढळून आला होता. त्यानंतर शंभर दिवसांनी देशातील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखावर गेली. त्यापुढील पंधरवड्यात आणखी एक लाख रुग्ण वाढले. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या ही 2 लाख 90 हजारांच्या वर गेली आहे. देशात एका दिवसात कोरोनाचे तब्बल 10,956 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 396 जणांचा मृत्यू झाला. याच दरम्यान अनेक भयंकर घटना समोर येत आहेत.
कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यावर अनेक ठिकाणी नातेवाईकांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवल्याच्या घटना घडत आहेत. रुग्णालयात मृतदेह पडून राहीले आहे. मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचे हाल होत आहेत. 14 मृतदेहांचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह फरफटत नेत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे.
ये अमानवीयता की हद है। किसी की मृत देह को ममताजी आपके राज में जिस तरह घसीटकर गाड़ी में पटका जा रहा है, वो असहनीय है। क्या सरकार इस बात की जवाबदेह नहीं है कि ये कृत्य क्यों किया गया।
— Kailash Vijayvargiya (@KailashOnline) June 11, 2020
जनता में भय के साथ पश्चिम बंगाल सरकार के प्रति गुस्सा भी है। pic.twitter.com/4Bw3r8TVrW
कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयातील मृतदेह हे महापालिकेच्या गाडीतून अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना ते फरफरत नेले जात आहेत. कर्मचाऱ्यांचा हा व्हिडीओ समोर आला असून गरिया स्मशानभूमीत ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हे अमानवी कृत्य असून लोकांच्या मनात याबाबत भीती असताना पश्चिम बंगाल सरकारवर रागही असल्याचं विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे.
CoronaVirus News : धक्कादायक! एका चुकीमुळे अनेकांचा जीव धोक्यातhttps://t.co/elfpelgWKa#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 12, 2020
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेची एक गाडी आली. त्यामधील 14 मृतदेह कर्मचाऱ्यांनी फरफटत स्मशानभूमीत नेले. हे मृतदेह कोरोना संक्रमित रुग्णाचे असू शकतात अशी शंकाही व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांनी मोठ्या संख्येनं या घटनेचा निषेध करून आंदोलन केलं. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यांनी स्थानिक नागरिकांची समजूत काढली. व्हिडीओची सत्यता अद्याप तपासण्यात आली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारत-चीन सीमाप्रश्नावरुन मोदींना टोलाhttps://t.co/1AdJUYrgws#Narendermodi#IndiaChinaBorder#IndiaChinaBorderTension#Congress
— Lokmat (@MiLOKMAT) June 12, 2020
महत्त्वाच्या बातम्या
"आता आपल्याकडे मौनेंद्र मोदी आहेत ते..."; भारत-चीन सीमावादावरून पंतप्रधानांवर निशाणा
CoronaVirus News : बापरे! तब्बल 35 निगेटिव्ह लोकांना दिला कोरोनाचा 'पॉझिटिव्ह' रिपोर्ट अन्...
CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्याला यश येणार, मांजरींवरील 'हे' औषध प्रभावी ठरणार?
देशातील प्रत्येक नागरिकाला रिलीफ फंडातून मिळणार 7500 रुपये?
CoronaVirus News : धोक्याची घंटा! कोरोनामुळे जगात तब्बल 10 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू
CoronaVirus News : 'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात कमी धोका; रिसर्चमधून खुलासा