CoronaVirus News : MASK लावायचा कंटाळा येतो?, 'हा' Video पाहिलात तर कधीच हटवणार नाहीत मास्क
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 04:23 PM2020-07-08T16:23:09+5:302020-07-08T16:38:30+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे.
नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल एक कोटीहून लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या सात लाखांच्या वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 20 हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तोंडाला मास्क लावण्याबाबत नवीन निर्देश जारी केले आहेत.
मास्क लावण्याचा अनेकांना कंटाळा येतो. पण असं करू नका कारण मास्क लावला नाही तर काय होऊ शकतं हे दाखवणारा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही कधीच चेहऱ्यावरून मास्क हटवणार नाहीत. मास्क कसा वापरावा, कोणता वापरावा हे सांगणारे अनेक व्हिडीओ हे याआधी समोर आले आहे. पण मास्क लावला नाही तर नेमकं काय होऊ शकतं हे आता सांगण्यात आलं आहे. ट्विटरवर हा महत्त्वाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून मास्क लावणं आणि न लावणं यातील फरक दाखवण्यात आला आहे.
Microdroplets are concerning when you watch this video under special light. All the more reason for masks. #COVID19pic.twitter.com/XX32OkyMuy
— Eric Feigl-Ding (@DrEricDing) July 7, 2020
सुरुवातीला मास्क न घालता एक व्यक्ती फक्त बोलते तेव्हा तिच्या तोंडातून ड्रापलेट्स निघतात. एका विशिष्ट प्रकाशात हे ड्रॉपलेट्स स्पष्ट दिसून येतात. डोळ्यांनी ते आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत. पण नंतर हीच व्यक्ती जेव्हा मास्क घालते तेव्हा तिच्या तोंडातून ड्रापलेट्स मास्कमुळे बाहेर येत नाहीत असं व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. मास्क लावणं किती महत्त्वाचं आहे यातून दिसून येत आहे. तसेच मास्क न लावल्यास कसा धोका निर्माण होऊ शकतो त्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : हँड सॅनिटायझरची निवड करताना अशी घ्या काळजी नाहीतर होईल मोठं नुकसानhttps://t.co/iFAVSpJynQ#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#handsanitizer#Health
— Lokmat (@MiLOKMAT) July 8, 2020
WHO ने जारी केलेल्या नव्या गाईडलाईन्समध्ये सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन ज्या ठिकाणी होत नाही तिथे मास्क घालणं बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे. नव्या गाईडलाईन्समध्ये हे मास्क कसे असावेत आणि त्यासाठी कोणतं साहित्य वापरण्यात यावं याबाबतही माहिती देण्यात आली आहे. तसेच मास्कच्या गुणवत्तेबाबतही सांगण्यात आले आहे. फेस मास्क हे तुम्ही घरीच तयार करू शकता किंवा दुकानातून अथवा मेडिकलमधूनही खरेदी करू शकता. हे मास्क खरेदी करताना ते कापडी असावेत याची काळजी घ्या.
CoronaVirus News : देशात पहिल्यांदाच 24 तासांत झाल्या 2.62 लाख कोरोना टेस्ट, ICMR ने दिली महत्त्वाची माहिती https://t.co/abwzFcYPhD#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 8, 2020
घरी मास्क तयार करताना त्यामध्ये तीन लेअर असावेत. गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं आवश्यक आहे. मास्क वापरण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होईल. रेल्वे, बस, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं गरजेचं आहे. WHO चे महासंचालक डॉक्टर टेड्रॉस एडहेनॉम यांनी फक्त फेसमास्कवर अवलंबून राहणं धोक्याचं आहे असं म्हटलं आहे. यासाठी इतर उपाययोजना आणि सरकारने घालून दिलेले नियम पाळणं गरजेचं आहे.आरोग्याची स्वच्छता, सुरक्षित अंतर आणि इतर उपाययोजना, सॅनिटाईज करणंही महत्त्वाचं आहे.
CoronaVirus News : जाणून घ्या प्राण्यांपासून किती आहे कोरोनाचा धोकाhttps://t.co/JgXBS2zR79#CoronaVirus#CoronaUpdates#COVID19Pandemic#pets#animals
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : हँड सॅनिटायझरची खरेदी करताना 'या' गोष्टी चेक करता का?; FDAने दिला मोलाचा सल्ला
शरद पवारांच्या 'मातोश्री' भेटीवरुन आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला, म्हणाले...
बापरे! पगार मागितला म्हणून मालकिणीने अंगावर सोडला कुत्रा, चेहऱ्यावर 15 टाके
CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! तब्बल 1 कोटी लोकांनी केली चाचणी
...म्हणून उत्तराखंडच्या पर्यटनमंत्र्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना पाठवलं 'रामायण'
"राहुल गांधी काही डॉक्टर नाहीत", 'त्या' आरोपांवर थेट कंपनीने दिलं प्रत्युत्तर
"मी महाराज किंवा टायगर नाही, कमलनाथ आहे; कोण मांजर आणि कोण उंदीर हे जनता ठरवेल"