CoronaVirus ...पण अर्थव्यवस्थाही पहावी लागेल; नितीन गडकरींचे लॉकडाऊनवर संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 10:08 PM2020-05-09T22:08:57+5:302020-05-09T22:11:00+5:30
लॉकडाऊनला लोकांनी गंभीरपणे घेतलेले आहे. यावरून लोक कोरोनालाही गंभीरतेने घेत असल्याचे दिसत आहे. अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठीही काम केले जात आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.
नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे लॉकडाऊन तीनवेळा वाढविण्यात आला आहे. कोरोनाचे संकट मोठे आहे आणि सरकारही गंभीर आहे. मात्र, देशाची अर्थव्य़वस्थाही पहावी लागेल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
लॉकडाऊनला लोकांनी गंभीरपणे घेतलेले आहे. यावरून लोक कोरोनालाही गंभीरतेने घेत असल्याचे दिसत आहे. अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठीही काम केले जात आहे. यासाठी छोट्या उद्योगपतींची काळजी घेण्यात येत आहे. कोरोना व्हायरसला हरविण्यासाठी देश यशस्वी होईल. आम्ही जिंकू, देशही या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडेल. सरकारचे प्रत्येक विषयाकडे लक्ष आहे. मजूर पायी जात आहेत, याचाही विचार सरकार करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
आज तकच्या एका कार्यक्रमामध्ये गडकरी बोलत होते. कोरोनाच्या संकटामुळे भारतासमोर एक सुवर्णसंधी आहे. जग चीनवर नाराज आहे. आमचे मंत्रायलही यावर विचार करत आहे. जो कोणी भारतात गुंतवणूक करून कंपनी सुरु करणार आहे, त्याला तीन महिन्यांत सर्व परवानग्या देण्यात येतील. परदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी काम केले जात आहे. कोरोनानंतर देशात ही गुंतवणूक वाढेल, असा विश्वास गडकरींना व्यक्त केला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा २०००० पार; दिवसभरात ४८ मृत्यू
CoronaVirus in Mumbai चिंताजनक! मुंबईत मृतांच्या आकड्यात वाढ; ७२२ नवे रुग्ण
लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी आता मोदींना साकडे; 1 कोटी पत्रं पाठविणार
अमित शहा अत्यवस्थ? खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनीच गायब असण्याचे सांगितले कारण
इराण सौदी अरेबियावर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकणार; तेलावरून वाजल्याने अमेरिकेने सुरक्षा काढली
महाराष्ट्र एसटीने मजुरांना सोडेल, पण मोदींनी मध्यस्थी करावी; शरद पवारांचे आवाहन