CoronaVirus News: कोरोनाची धास्ती! 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय; थेट 31 जुलैपर्यंत वाढवला लॉकडाउन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 08:57 PM2020-06-24T20:57:18+5:302020-06-24T21:06:34+5:30

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरू आहे. बेंगळुरूसह इतरही काही शहरे पुन्हा लॉकडाउनचा विचार करत आहेत. महानगरांमध्ये कोरोनाचा वेग वाढल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 लाख 50 हजारचा टप्पाही ओलांडला आहे. 

CoronaVirus Marathi News west bengal government extends lockdown till 31july | CoronaVirus News: कोरोनाची धास्ती! 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय; थेट 31 जुलैपर्यंत वाढवला लॉकडाउन

CoronaVirus News: कोरोनाची धास्ती! 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय; थेट 31 जुलैपर्यंत वाढवला लॉकडाउन

googlenewsNext
ठळक मुद्दे महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही कोरोनाने वेगाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे.पश्चिम बंगाल सरकारने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात 31जुलैपर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी चेन्नई, नंतर गुवाहाटी आणि आता पश्चिम बंगालने लॉकडाउन लागूदेखील केला आहे.

कोलकाता : महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही कोरोनाने वेगाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम बंगाल सरकारने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पश्चिम बंगालमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाउन लागू राहील. मात्र, लॉकडाउनमध्ये पूर्वीपेक्षा अधिक सूट देण्यात येईल, असेही ममता बॅनर्जी सरकारने म्हटले आहे. 

लॉकडाउनचा निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक -
लॉकडाउनचा निर्णय घेण्यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत नवे कोरोनाबाधीत आणि राज्याची स्थिती, यासंदर्भात चर्चा झाली. यानंतर राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सांगण्यात येते, की काही सूट आणि काही अटींच्या आधारे 31 जुलैपर्यंत लॉकडाउन लागू राहील.

देशात पुन्हा लॉकडाउनची शक्यता -
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरू आहे. चेन्नई, नंतर गुवाहाटी आणि आता पश्चिम बंगालने लॉकडाउन लागूदेखील केला आहे. बेंगळुरूसह इतरही काही शहरे पुन्हा लॉकडाउनचा विचार करत आहेत. महानगरांमध्ये कोरोनाचा वेग वाढल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 लाख 50 हजारचा टप्पाही ओलांडला आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना तामिळनाडू सरकारने चेन्नै आणि जवळपासच्या तीन जिल्ह्यांत 30 जूनपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने गुवाहाटीच्या 11 नगर पालिका भागांत मंगलवारपासून 14 दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे.

बंगालमध्ये 580 जणांचा बळी -
पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत एकूण 14,728 कोरोनाबाधित समोर आले आहेत. यापैकी, कोरोनाचे एकूण 9,218 रुग्ण बरेही झाले आहेत. तर 580 जणांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यात एकूण 4,930 अॅक्टिव रुग्ण आहेत. याशिवाय 1,81,388 जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: सर्दी-खोकल्याच्याही आधी दिसू शकतात कोरोनाची 'ही' अतिगंभीर लक्षणं, नव्या अभ्यासाचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार

मोदी सरकारनं पतंजलीच्या कोरोना औषधाची जाहिरात थांबवली, बाबा रामदेव म्हणाले...

Web Title: CoronaVirus Marathi News west bengal government extends lockdown till 31july

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.