CoronaVirus News : Hydroxychloroquine की Remdesivir... कोरोनावर कोणतं औषध प्रभावी?, तज्ज्ञ म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 06:17 PM2020-05-05T18:17:05+5:302020-05-05T18:19:47+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे.
नवी दिल्ली - जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा अडीच लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा 46 हजारांच्या वर पोहोचला आहे. तर 1500 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.
कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी ज्या देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांची आवश्यकता असेल त्यांच्या मागण्यांची पूर्तता केली जाईल असे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. याच दरम्यान भारतात आणखी एक औषधं ही कोरोना व्हायरला टक्कर देत असल्याची माहिती समोर आली आली आहे. रेमडेसिवीर हे औषध कोरोनावर उपयुक्त असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र Hydroxychloroquine आणि Remdesivir पैकी कोणतं औषध कोरोनावर प्रभावी आहे याबाबत आता तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
#WATCH Comparison between hydroxychloroquine & remdesivir is not right because we do not know the efficacy of both of them till now. Which one is better can only be ascertained after trials: Dr Shekhar C Mande, DG of Council of Scientific & Industrial Research (CSIR) #COVID19pic.twitter.com/0QEGJftKdv
— ANI (@ANI) May 5, 2020
काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्चचे डायरेक्टर डॉ. शेखर सी मांडे यांनी रेमडेसिवीर आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीन यापैकी कोणतं औषध प्रभावी आहे याबाबत माहिती दिली आहे. या दोन्ही औषधांमध्ये सध्या तुलना करणं योग्य नाही कारण रेमडेसिवीरला यूएसमध्ये अतिशय गंभीर रुग्णांवर उपचारासाठी मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय या दोन्ही औषधांची सध्या चाचणी सुरू आहे. त्यामुळे त्यांची तुलना करू शकत नाही. म्हणूनच आता कोणतं औषधं चांगलं आहे आणि कोणतं नाही हे सांगू शकत नाही असं मांडे यांनी म्हटलं आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 2,52,675 जणांचा मृत्यू; अमेरिकेत परिस्थिती गंभीरhttps://t.co/1abhMkoiW6#coronavirus#COVIDー19
— Lokmat (@MiLOKMAT) May 5, 2020
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नेहमीप्रमाणे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही चिंताजनक माहिती दिली आहे. देशात कोरोनाचे एकूण 46433 रुग्ण झाले असून गेल्या 24 तासांतील आकडा चिंता वाढविणारा आहे. या काळात देशभरात 3900 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 1020 रुग्ण बरे झाले आहेत. धक्कादायक म्हणजे आज सर्वाधिक 195 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांची सरासरी वाढली असून ती 27.41% झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले आहे.
CoronaVirus News : महाराष्ट्रातील 'या' शहरात सगळी दुकानं उघडणार, लग्नसोहळेही होणार... अर्थात अटी-शर्ती लागूhttps://t.co/tt5OfdVPti#CoronaUpdatesInIndia#Maharashtra
— Lokmat (@MiLOKMAT) May 5, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 2,52,675 जणांचा मृत्यू; अमेरिकेत परिस्थिती गंभीर
CoronaVirus News : "...हे तर आमच्याकडून देशासाठी केलेलं दान", मद्यप्रेमीचा 'हा' Video व्हायरल
CoronaVirus News : खोकल्याचं औषध घेत असाल तर वेळीच व्हा सावध, वाढू शकतो कोरोनाचा धोका?