CoronaVirus News : बापमाणूस! रणरणत्या उन्हात चिमुकल्यांसाठी तो झाला 'श्रावणबाळ'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 10:14 AM2020-05-17T10:14:13+5:302020-05-17T10:33:12+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काहींनी पायी जाण्याचा पर्याय देखील निवडला आहे.
रायपूर - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काहींनी पायी जाण्याचा पर्याय देखील निवडला आहे. याच दरम्यान अनेक मन हेलावून टाकणाऱ्या घटना तर काही हृदयद्रावक फोटो हे समोर येत आहेत.सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे.
रणरणत्या उन्हात अनेक मजूर हे पायी चालत आपल्या कुटुंबीयांसह गाव गाठत आहेत. छत्तीसगड येथील करनूलमधील दोन प्रवासी मजूर आपल्या मुलांसह घरी चालत निघाले होते. यात एका वडिलांनी आपल्या चिमुकल्यांना चालण्याचा त्रास होऊ नये यासाठी कावड केली असून त्यामध्ये घेतलं होतं आणि त्याचा पायी प्रवास सुरू होता. पोलिसांनी हे दृश्य पाहताच त्यांना मदतीचा हात दिला आहे. आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील अडोनी पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचारी जगदीश कुमार यांनी मजुरांना मोठी मदत केली.
फक्त एक कप चहाने अनेकांचं आयुष्य वाचवलं; जाणून घ्या 'त्या' दिवशी नेमकं काय झालं?https://t.co/JYBGSxFYHg#Auriya#Accident
— Lokmat (@MiLOKMAT) May 17, 2020
जगदीश कुमार यांनी मजुरांसाठी वाहनाची व्यवस्था केली. यासोबतच जेवणाची देखील सोय केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा आणखी एक सहकारी होता. पोलिसांनी मजुरांना त्यांच्या घरी पायी जात असलेलं पाहिलं. याआधी ते कूरनूल येथील यमिगनू शहरात दिसले होते. त्यांना या अवस्थेत पाहून त्यांनी कुटुंबाला थांबवलं आणि मजुरांसाठी खाण्याची व्यवस्था केली. यानंतर त्यांना गावी कसं सोडता येईल यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. पोलिसांनी केलेल्या या मदतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 हजारांवर; 'या' 5 शहरांतील स्थिती गंभीरhttps://t.co/GAaCdAVS8N#CoronaInMaharashtra#coronavirus#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 17, 2020
महत्त्वाच्या बातम्या
फक्त एक कप चहाने अनेकांचं आयुष्य वाचवलं; जाणून घ्या 'त्या' दिवशी नेमकं काय झालं?
चीनच्या कंपन्यांना खेचण्यासाठी भारताचा 'डाव'; 'या' 9 राज्यांत देणार वाव
पाकिस्तान घाबरला! POK मध्ये पेरले भूसुरुंग; आपत्कालीन निविदा केली जारी
धक्कादायक! IASच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अधिकाऱ्याने आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट; उडाली खळबळ
पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानानंतर काशी विश्वनाथ मंदिराने घेतला मोठा निर्णय
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांवर; 3 लाख लोकांचा मृत्यू