विमानात मास्कसक्ती; नसल्यास बाहेर काढणार, केंद्राचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 08:23 AM2022-06-09T08:23:00+5:302022-06-09T10:58:44+5:30

Coronavirus : डीजीसीएने सांगितले की, विमानतळावर प्रत्येकाने मास्क घातला की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सीआयएसएफ जवानांवर सोपविली आहे.

Coronavirus : Masking on the plane; If not, it will be taken out, the decision of the Center | विमानात मास्कसक्ती; नसल्यास बाहेर काढणार, केंद्राचा निर्णय

विमानात मास्कसक्ती; नसल्यास बाहेर काढणार, केंद्राचा निर्णय

googlenewsNext

नवी दिल्ली : देशात कोरोनाची साथ वाढत असल्यामुळे केंद्र  सरकारने आता विमानतळावरविमानांमध्ये प्रवासी व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले. मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना उड्डाणापूर्वी विमानातून खाली उतरविणे व त्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 
यासंदर्भात नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने बुधवारी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. दिल्ली हायकोर्टाने यासंदर्भात केंद्राला ३ जूनला आदेश दिला होता. डीजीसीएने सांगितले की, विमानतळावर प्रत्येकाने मास्क घातला की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सीआयएसएफ जवानांवर सोपविली आहे.

हवाई सुंदरी, पायलट यांनाही नियम लागू
मास्क बंधनकारक असण्याचा नियम विमानतळावरील, तसेच विमानातील सर्व कर्मचारी, प्रवासी यांच्यासाठी लागू असेल, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला दिले होते. हा नियम पायलट, हवाई सुंदरी, फ्लाईट अटेंडंट यांनाही लागू आहे.

Read in English

Web Title: Coronavirus : Masking on the plane; If not, it will be taken out, the decision of the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.