Coronavirus: संपूर्ण राज्यात फक्त १२ कोरोना रुग्ण; तरीही लॉकडाऊन वाढवण्याची ‘या’ मुख्यमंत्र्यांची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 04:43 PM2020-04-27T16:43:15+5:302020-04-27T16:46:52+5:30
केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले की ही दीर्घ लढाई आहे
नवी दिल्ली – कोरोनाला रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. देशभरात आतापर्यंत २७ हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर ८५० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यात ३ मे नंतर लॉकडाऊन वाढवावा की नाही यावर चर्चा करण्यात आली.
पंतप्रधानासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सर्व मुख्यमंत्र्यांनी आपापली मते मांडली. त्यावेळी मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी लॉकडाऊनवर पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी आमच्या राज्यात ३ मे नंतरही लॉकडाऊन कायम ठेवावा अशी इच्छा आहे. त्याचसोबत ज्या विभागाचा ग्रीन झोनमध्ये समावेश येतो त्यासाठी लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आणू शकतो असंही ते म्हणाले.
विशेष म्हणजे मेघालय देशातील असं राज्य आहे ज्याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या अतिशय कमी आहे. मेघालयची स्थिती उत्तम आहे. मेघालयमध्ये २६ एप्रिल संध्याकाळी ५ पर्यंत फक्त १२ कोरोनाचे रुग्ण होते. तर आतापर्यंत १ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मेघालयच्या खालोखाल गोवा, पुडुचेरी, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि मिझारोम अशी छोटी राज्य आहेत. ज्याठिकाणी कोरोनाचा परिणाम कमी प्रमाणात आढळला.
दरम्यान, केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले की ही दीर्घ लढाई आहे आणि लॉकडाऊन योग्य पद्धतीने पाळले पाहिजे. त्याचबरोबर या व्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या वतीने असंही म्हटलं आहे की लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारकडून कशाप्रकारे मदत दिली जाऊ शकते याविषयी राज्यांनी आपापले धोरण तयार करावे असंही सांगण्यात आलं आहे.
त्याचसोबत ज्या भागात कोरोनाचा परिणाम होत नाही अशा ठिकाणी आर्थिक व्यवहार लक्षात घेऊन लॉकडाऊनमधून काहीसा दिलासा मिळू शकतो. कोरोना संक्रमित भागात लॉकडाऊन सुरू ठेवता येते. पण ३ मे नंतर लॉकडाऊन वाढल्यास त्याचे स्वरूप काय असेल, हे वास्तव चित्र पंतप्रधान मोदींच्या अभिभाषणानंतरच स्पष्ट होईल.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
उत्तर कोरियाचा हुकूमशहा मिसाईल चाचणीवेळी जखमी झाला? कोरियाई अधिकाऱ्याने केला दावा
राज्य सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना ‘या’ निर्णयाचा फटका; एप्रिलचा पगार लांबणीवर पडणार?
जाणून घ्या, भारतात कोरोनाचा संसर्ग कधी संपुष्टात येणार?; सिंगापूर युनिव्हर्सिटीचा मोठा दावा!
...तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल; केंद्रीय टीमचा धक्कादायक अंदाज
मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर 'जिवंत' झाली महिला; डॉक्टर अन् कुटुंबाला बसला जबर धक्का