CoronaVirus: स्थलांतरित मजुरांना राज्यातच काम करण्याची केंद्राची मुभा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 06:38 AM2020-04-20T06:38:20+5:302020-04-20T06:40:13+5:30
‘लॉकडाउन’ संपेपर्यंत मजुरांना सध्या जेथे राहात आहेत त्या राज्यातून काहीही झाले तरी दुसऱ्या राज्यात जाता येणार नाही, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली : ‘लॉकडाउन’मुळे घराकडे परतताना मध्येच अडवून विविध राज्यांमध्ये निवारा शिबिरांमध्ये व्यवस्था केलेले स्थलांतरित मजूर त्यांच्या इच्छेनसार व कौशल्यानुसार उद्या सोमवार २० एप्रिलपासून त्याच राज्यांत रोजंदारीवर काम सुरु करू शकतील, अशी मुभा केंद्र सरकारने रविवारी दिली.
‘लॉकडाउन’ संपेपर्यंत मजुरांना सध्या जेथे राहात आहेत त्या राज्यातून काहीही झाले तरी दुसऱ्या राज्यात जाता येणार नाही, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मजुरांना मूळ गावी घरी जाता आले नाही तरी त्यांची रोजीरोटी काही प्रमाणात सुरु होऊ शकेल. केंद्राय गृहसचिव राजीव भल्ला यांनी यासंबंधीचा सुधारित आदेश सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना व केंद्रातील सर्व मंत्रालयांना पाठविला.
नियमांचे पालन करावे लागेल
काम करू इच्छिणाºया मजुरांसाठी कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बसची व्यवस्था व प्रवासातील त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही स् ाानिक प्रशासनाने करायची आहे. बसच्या प्रवासात ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे व त्यांना काम देताना ‘लॉकडाऊन’ शिथिलीकरणासंबंधी १५ एप्रिल रोजी जारी केलेल्या मागदर्शिकेचे कठोरपणे पालन करावे लागेल.
नोंदणी आवश्यक
या मजुरांची व कोणाला कोणत्या प्रकारचे काम येते याची नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करायची आहे. यापैकी जे मजूर त्याच राज्यात पूर्वी काम करणारे असतील व त्यांना पुन्हा त्या कामावर जाण्याची इच्छा असेल तर त्यांना तेथे जाण्याची मुभा असेल.