CoronaVirus: नियमांत बदल! कामाच्या ठिकाणी थुंकल्यास होणार शिक्षा अन् भरावा लागणार जबर दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 03:29 PM2020-05-19T15:29:05+5:302020-05-19T15:40:09+5:30

संक्रमणाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच राज्यांनी लॉकडाऊन शिथिल केलेले नाही.

CoronaVirus: ministry of health issued guidelines for offices and workplaces vrd | CoronaVirus: नियमांत बदल! कामाच्या ठिकाणी थुंकल्यास होणार शिक्षा अन् भरावा लागणार जबर दंड

CoronaVirus: नियमांत बदल! कामाच्या ठिकाणी थुंकल्यास होणार शिक्षा अन् भरावा लागणार जबर दंड

Next
ठळक मुद्देआरोग्य मंत्रालयाने कार्यालये व कार्य स्थळांसाठी नवीन मार्गदर्शक सूचनांची नियमावली जारी केली आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार एखादी व्यक्ती कामाच्या ठिकाणी थुंकताना आढळली, तर त्या व्यक्तीला जबर शिक्षा होऊ शकतेराज्यांची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर झाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने कार्यालये व कामाची ठिकाणे यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

नवी दिल्लीः देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला असून, आरोग्य मंत्रालयाने कार्यालये व कार्य स्थळांसाठी नवीन मार्गदर्शक सूचनांची नियमावली जारी केली आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार एखादी व्यक्ती कामाच्या ठिकाणी थुंकताना आढळली, तर त्या व्यक्तीला जबर शिक्षा होऊ शकते, तसेच दंडही ठोठावला जाऊ शकतो. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 18 ते 31 मेदरम्यान सुरू राहणार आहे. संक्रमणाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच राज्यांनी लॉकडाऊन शिथिल केलेला नाही.

विशेष म्हणजे अशा काळात अशी काही राज्ये आहेत ज्यांनी 100% कर्मचार्‍यांसह सर्व कार्यालये उघडण्याची परवानगी दिली आहे. राज्यांची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर झाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने कार्यालये व कामाची ठिकाणे यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, त्यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना

१- कार्यालयातील कर्मचार्‍यांमध्ये अंतर कायम राखणं आवश्यक आहे. आसन व्यवस्थेसह अनेक गोष्टींसाठी 1 मीटर आवश्यक आहे.
२- मास्क किंवा कपड्याने तोंड झाकून घ्यावं लागणार.
३ - साबण किंवा सॅनिटायझरने छोट्या अंतराने हात स्वच्छ करा.
4- आजारी असल्यास त्या विषयी स्थानिक प्रशासनास माहिती देणे बंधनकारक आहे.
5- शिंकताना किंवा खोकताना तोंड झाकून घ्या.
6- ऑफिस जाताना सावधगिरी बाळगा. सार्वजनिक ठिकाणी गोष्टींना स्पर्श करणे टाळा.
7- कार्यालयात एखाद्यास कोरोना संसर्ग असल्यास संक्रमित व्यक्ती गेल्या 48 तासांत जिथे कुठे जाऊन आली, त्या भागाचं निर्जंतुकीकरण केले पाहिजे. निर्जंतुकीकरणानंतरच काम सुरू केले जाऊ शकते. कार्यालय किंवा इमारतीच्या संपूर्ण भागास सील करण्याची आवश्यकता नाही.
8- एखाद्या कार्यालयात किंवा इमारतीत कोरोनाची अनेक प्रकरणे आढळल्यास 48 तास संपूर्ण कार्यालय सीलबंद केले जाईल. जोपर्यंत त्या कार्यालयात निर्जंतुकीकरण करून सुरक्षित घोषित केले जात नाही, तोपर्यंत प्रत्येकाला घरून काम करावे लागेल.

देशात संसर्ग झालेल्यांची संख्या 1 लाखांच्या पुढे गेली आहे
गेल्या 24 तासात कोरोना संसर्गाच्या 4,970 नवीन प्रकरणानंतर संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 1,01,139 पर्यंत वाढली आहे. गेल्या 24 तासात 134 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 3,163 वर पोहोचली आहे. 110 दिवसांत भारताने हा आकडा ओलांडला आहे, तर तुर्कीमध्ये अवघ्या 44 दिवसांत रुग्णांचा हा आकडा ओलांडला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

Coronavirus: रेकॉर्ड ब्रेक उसळीनंतर सोन्याच्या भावात घसरण; जाणून घ्या आजचा दर

'त्या' संकटांनं केलं भीषण स्वरूप धारण, मोदी अन् शहांनी घेतला परिस्थितीचा आढावा

धक्कादायक! चीनच्या दबावाखाली येत नेपाळनं बनवला नकाशा अन् भारताच्या भागावर दाखवला 'कब्जा'

जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय; ढवळाढवळ करणार नाही, तालिबान्यांनी पाकिस्तानचे कान टोचले

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

CoronaVirus: चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार; इम्युनिटी कमी असलेल्या वयोवृद्धांचा धोका वाढणार

Web Title: CoronaVirus: ministry of health issued guidelines for offices and workplaces vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.