CoronaVirus News: प्लाझ्मा, रेमडेसिविरची आरोग्य मंत्रालयाकडून शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 04:51 AM2020-06-15T04:51:37+5:302020-06-15T07:04:40+5:30

औषधांच्या वापराबाबतचा प्रोटोकॉलही ठरवून देण्यात आला आहे.

CoronaVirus Ministry of Health Recommends plasma remdesivir | CoronaVirus News: प्लाझ्मा, रेमडेसिविरची आरोग्य मंत्रालयाकडून शिफारस

CoronaVirus News: प्लाझ्मा, रेमडेसिविरची आरोग्य मंत्रालयाकडून शिफारस

googlenewsNext

मुंबई : प्लाझ्मा थेरपी आणि रेमडेसिवीर या अ‍ॅण्टीव्हायरल औषधाच्या ट्रायलबाबत साशंक असलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या दोन्ही औषधोपचारांचा वापर करण्याची शिफारस केली आहे. हायड्रोक्सिक्लोरोक्वीन (एससीक्यू) हे औषध केवळ उपचारांच्या पहिल्या टप्प्यातच द्यायचे असा बदलही या विभागाने सुचविला आहे. तसेच, या औषधांच्या वापराबाबतचा प्रोटोकॉलही ठरवून देण्यात आला आहे.

कमी गंभीर लक्षणे असलेल्या ज्या रुग्णांवर स्टेरॉईडची मात्रा लागू पडत नसेल आणि त्यांची ऑक्सिजनची गरज वाढत असेल तर त्यांच्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करणे संयुक्तिक ठरेल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. हे बदल सुधारित क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलचा एक भाग आहेत. एचसीक्यूचा वापर अतिदक्षता विभागात असलेल्या गंभीर रुग्णांसाठी करावा, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र, या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार एचसीक्यू जास्तीत जास्त प्रभावी ठरण्यासाठी ती उपचारांच्या पहिल्या टप्प्यावर आणि कमी गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना द्यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. एचसीक्यूमध्ये अ‍ॅझिथ्रोमाइसिन आहे. त्यामुळे त्याचा वापर अधिक सुरक्षितपणे करणे आवश्यक आहे. प्रभावी परिणामांसाठी रुग्णांवर शक्य तितक्या लवकर या औषधाचा वापर करावा. गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना हे औषध देणे टाळले पाहिजे. तसेच, या औषधाचा वापर करण्यापूर्वी रुग्णांचा ईसीजी तपासावा, असेही या शिफारशींमध्ये नमूद केले आहे.

औषधांच्या वापरानंतर जी काही निरीक्षणे आढळतात त्यानुसार हे निर्णय घेतले जातात. रेमडेसिविर हे अ‍ॅण्टीव्हायरल औषध सार्स आजारात काही प्रमाणात प्रभावी ठरले होते. परंतु, त्यामुळे शरीरात एका आठवड्यानंतर टॉसिलीझुमब तयार व्हायला सुरुवात होते. त्यामुळे या औषधाच्या वापराबाबत काही मतांतरे आहेत. ते औषध प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेलच, असे ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे काटेकोरपणे वैद्यकीय देखरेखीखाली ते देण्याची गरज व्यक्त होत आहे. त्याशिवाय प्लाझ्मा थेरपी ही सर्व प्रकारच्या रुग्णांना उपयुक्त ठरणारी नाही. त्यामुळे या थेरपीच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रोटोकॉल देण्यात आला आहे.

Web Title: CoronaVirus Ministry of Health Recommends plasma remdesivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.