CoronaVirus Lockdown: 'असा' असणार चौथा लॉकडाऊन; जाणून घ्या काय बंद अन् काय सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 07:38 PM2020-05-17T19:38:50+5:302020-05-17T19:45:44+5:30

देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू; ३१ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार

coronavirus modi government extends lockdown till 31st may know the ruleskkg | CoronaVirus Lockdown: 'असा' असणार चौथा लॉकडाऊन; जाणून घ्या काय बंद अन् काय सुरू

CoronaVirus Lockdown: 'असा' असणार चौथा लॉकडाऊन; जाणून घ्या काय बंद अन् काय सुरू

Next

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. याबद्दलचं केंद्र सरकारचं पत्रक समोर आलेलं आहे. यानंतर आता चौथ्या लॉकडाऊनमधील नियमावलीची माहिती पुढे आलेली आहे. चौथ्या लॉकडाऊनचे नियम नवे असतील, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यांना जास्तीचे अधिकार देण्यात येतील, असे सूतोवाचदेखील पंतप्रधानांनी केले होते. 

केंद्र सरकारनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्याआधी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रापाठोपाठ तमिळनाडू, पंजाब, तेलंगणानंदेखील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व व्यवस्थापन विभागानं देशातला लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवत असल्याचं जाहीर केलं. तिसऱ्या टप्प्याच्या तुलनेत चौथ्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जाणार आहे.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो, लोकल, विमानसेवा बंदच राहील. पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काही मुख्यमंत्र्यांनी विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र विमानतळं मुख्य शहरांमध्ये येतात आणि त्या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यानं विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. मजुरांना घरी सोडण्यासाठी सुरू असलेल्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सुरूच राहतील.

शाळा, महाविद्यालयं, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्स लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातदेखील बंद राहणार आहेत. क्रीडा संकुलं आणि स्टेडियम उघडण्यात येतील. मात्र तिथे प्रेक्षकांना परवानगी नसेल. धार्मिक स्थळं बंदच राहतील. धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांनादेखील परवानगी नसेल. राजकीय कार्यक्रमांचं आयोजनही करता येणार नाही.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी काही नवे नियम करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य सरकारांना काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत. रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन वगळता दोन राज्यं एकमेकांच्या सहमतीनं बसेस सुरू करू शकतात. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन निश्चित करण्याचे अधिकारदेखील राज्यांना देण्यात आले आहेत. सरकारी कार्यालयं सुरू राहणार असून त्या कार्यालयांमधलं कँटिनही सुरू असेल. याशिवाय संध्याकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यू राहील.

देशातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढले, केंद्र सरकारकडून घोषणा

VIDEO: सोनियांचं नाव घेत अर्थमंत्र्यांनी थेट हातच जोडले; पाहा नेमके काय घडले 

कोरोनाचा असाही परिणाम; तब्बल २६ कोटी भारतीयांची चिंता वाढणार

Web Title: coronavirus modi government extends lockdown till 31st may know the ruleskkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.