coronavirus: कोरोना संकटादरम्यान १४ सप्टेंबरपासून सुरू होणार संसदेचं पावसाळी अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 06:40 PM2020-08-25T18:40:19+5:302020-08-25T18:58:27+5:30

संसदीय व्यवहारांबाबतच्या कॅबिनेट कमिटीने १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत संसदेचे अधिवेशन आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

coronavirus: The monsoon session of Parliament will begin on September 14 during the Corona crisis | coronavirus: कोरोना संकटादरम्यान १४ सप्टेंबरपासून सुरू होणार संसदेचं पावसाळी अधिवेशन

coronavirus: कोरोना संकटादरम्यान १४ सप्टेंबरपासून सुरू होणार संसदेचं पावसाळी अधिवेशन

Next

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संकटादरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, संसदीय व्यवहारांबाबतच्या कॅबिनेट कमिटीने १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत संसदेचे अधिवेशन आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सभागृहांमध्ये मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेच्या मान्सून अधिवेशनामध्ये यावेळी एकूण १८ बैठका होणार आहेत. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहामधील तयारीला वेग देण्यात आला आहे. मार्च महिन्यामध्ये कोरोनाचे संकट वाढल्यानंतर अधिवेशन आटोपले घेतले गेल्यानंतर पहिल्यांदाच संसदेचे कामकाज होणार आहे.

लोकसभा आणि राज्यसभेमध्ये खासदारांच्या बैठकीसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे सभागृहात सध्या असलेल्या आसनव्यवस्थेसोबतच गॅलरीमध्येही सभासद बसलेले दिसणार आहेत. राज्यसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार सभासग गॅलरी आणि चेंबर अशा दोन्ही ठिकाणी बसतील.

१९५२ नंतर प्रथमच संसदेमध्ये अशाप्रकारची आसनव्यवस्था केली जाणार आहे. कामकाजादरम्यान ६० सदस्य हे चेंबरमध्ये बसतील. ५१ जण गॅलरीत बसतील. तर उर्वरित १३२ जणांना चेंबरमध्ये बसवण्यात येईल. अशाच प्रकारची व्यवस्था लोकसभेमध्ये लागू करण्यात येणार आहे.

दोन्ही सभागृहात सदस्य बसणार असल्याने दोन्ही सभागृहांना जोडण्याचीही व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी पहिल्यांदाच मोठी स्क्रीन लावण्यात येईल. गॅलरी-चेंबरमध्ये सॅनिटायझेशन केले जाईल. तसेच दोन्ही सभागृहांना जोडण्यासाठी केबलची व्यवस्था असेल. तसेच योग्य अंतर राखले जावे यासाठी सभासदांच्या बसण्याच्या जागेवर केबिनसारखी व्यवस्था केली जाईल.

मार्च महिन्यामध्ये संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाचा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले होते. त्यामुळे नंतर संसदेचे सभागृह सुरू होऊ शकले नव्हते. यादरम्यान, संसदीय समित्यांची बैठक हल्लीच्या दिवसांमध्येच झाली. तसेच सभागृहाचे कामकाज चालवण्याबाबत राज्यसभा, लोकसभेच्या अध्यक्षांकडून अनेक बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या.

Web Title: coronavirus: The monsoon session of Parliament will begin on September 14 during the Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.