CoronaVirus : देशात ५० कोटींहून अधिक कोरोना चाचण्या, उपचार घेणारे घटले; ३६ हजार रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 05:44 AM2021-08-20T05:44:07+5:302021-08-20T05:44:35+5:30
CoronaVirus : ३ कोटी २३ लाख २२ हजार २५८ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी १५ लाख २५ हजार ८० जण बरे झाले आहेत. ३ लाख ६४ हजार १२९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
नवी दिल्ली : देशात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी घट झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाचे ३६,४०१ नवे रुग्ण आढळले असून आणखी ५३० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ९७.५७ टक्के जण बरे झाले. आजवर केलेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा ५० कोटींवर पोहोचला आहे.
३ कोटी २३ लाख २२ हजार २५८ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी १५ लाख २५ हजार ८० जण बरे झाले आहेत. ३ लाख ६४ हजार १२९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. गेल्या १४९ दिवसांतील हा सर्वात कमी आकडा आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ४९ जण मरण पावले आहेत.
राज्यांना दिले डाेस
केंद्र सरकारने आतापर्यंत राज्यांना कोरोना लसीच्या ५८.३१ कोटी डोसचा पुरवठा केला आहे. त्यातील ५६ कोटी २९ लाख डोसचा राज्यांनी वापर केला. वाया गेलेल्या डोसचाही या आकडेवारीत समावेश आहे.