Coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल; रक्कम केंद्राने ठरवावी, सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 12:43 PM2021-06-30T12:43:01+5:302021-06-30T12:44:09+5:30

Coronavirus in India:

Coronavirus: must compensate the families of those who die due to Coronavirus; The amount should be decided by the Center, an important order of the Supreme Court | Coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल; रक्कम केंद्राने ठरवावी, सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश 

Coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल; रक्कम केंद्राने ठरवावी, सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश 

Next

नवी दिल्ली - गेल्या सव्वा वर्षापासून देशात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे आतापर्यंत चार लाखांहून लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. (Coronavirus in India) कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी आणि या नुकसानभरपाईची रक्कम किती असावी हे केंद्र सरकारने स्वत: ठरवावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. (must compensate the families of those who die due to Coronavirus; The amount should be decided by the Center, an important order of the Supreme Court)

सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंवर प्रत्येकी चार लाख रुपये नुकसानभरपाई देणे शक्य नसल्याचे मान्य केले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एनडीएमएला सांगितले की, किमान मोबदला देता येईल अशी एक व्यवस्था बनवण्यात यावी.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे मृत्यू प्रमाणपत्र केंद्र सरकारने जारी करावेत. तसेच जी प्रमाणपत्रे आधीच जारी झाली आहेत, त्यामध्ये सुधारणा करण्यात याव्यात, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिली. तसेच यावर सुनावणी करताना केंद्र सरकारने एनडीएमएच्या अधिकाऱ्यांना फटकारही लगावली.

या प्रकरणी अनेक याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केली होती. कोरोनामुळे ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशा व्यक्तींच्या कुटुंबीयांना आपत्ती कायद्यांतर्गत चार लाख रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी या याचीकांमधून करण्यात आली होती. याशिवाय याचिकाकर्त्यांकडून कोविड डेथ सर्टिफिकेटबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांकडे उत्तर मागितले होते.

मात्र केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात जे शपथपत्र देण्यात आले त्यामध्ये असे करण्यास केंद्र सरकारकडून असमर्थता व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारकडून सांगण्यात आले की, असे करणे शक्य नाही, त्यापेक्षा सरकारकडून आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. चार लाख रुपयांची मदत ही कुठल्याही आपत्तीच्या वेळी मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिली जाते. मात्र कुठल्याही साथीच्या वेळी अशी मदत देणे शक्य होत नाही.  

भारतात गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू आहे. या साथीमुळे देशाच आतापर्यंत चार लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर या साथीचा प्रभाव आता काहीसा कमी होऊ लागला आहे. मात्र अजूनही देशात दररोज चाळीस हजारांहून अधिक रुग्णांचे निदान होत आहे. 

Web Title: Coronavirus: must compensate the families of those who die due to Coronavirus; The amount should be decided by the Center, an important order of the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.