Coronavirus: नरेंद्र मोदींनी विदेशातील, अमित शहांनी देशातील मोर्चा सांभाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 12:58 AM2020-05-04T00:58:01+5:302020-05-04T07:26:27+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात गृहमंत्रालयाने सरासरी दररोज एक आदेश जारी करत देशातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन यशस्वी करण्याचे काम केले.
संतोष ठाकूर
नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात पहिल्या ४० दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी नेत्यांशी चर्चा केली. जागतिक पातळीवर कोरोनाबाबत सुरूअसलेल्या तयारीची माहिती घेतली, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात गृहमंत्रालयाने सरासरी दररोज एक आदेश जारी करत देशातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन यशस्वी करण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर २५ मार्च रोजी पहिला कॉल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना केला, तर केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनशी संबंधित पहिला आदेश २४ मार्च रोजी जारी केला. यात कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती असल्याचे स्पष्ट करत दिशानिर्देश जारी केले होते. पंतप्रधान मोदी यांनी या काळात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, सौदीचे क्राऊन प्रिन्स मो. बिन सलमान, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी आणि युरोपियन कमिशनचे प्रेसिडेंट उरसुला वॉन डेर लेयान यांच्याशी चर्चा केली. जी- २० च्या नेत्यांशीही त्यांनी चर्चा केली. फ्रान्सचे राष्ट्रपती, कुवैतचे पंतप्रधान, जर्मनीचे चान्सलर वेलेश के प्रिन्स, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्राझीलचे राष्ट्रपती, आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान, स्वीडनचे पंतप्रधान, नेपाळचे पंतप्रधान, बांगलादेशचे पंतप्रधान आदींशी चर्चा केली.