स्वावलंबी भारत होवो! एकूण २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 08:24 PM2020-05-12T20:24:41+5:302020-05-12T22:54:29+5:30

नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केले आहे. करोडो लोक संकटाचा सामना करत आहेत. आम्ही असे संकट ना पाहिलेय नाही ऐकले. हे कल्पनेपलिकडचे आहे. आम्हाला कोरोनाआधीच्या जगाला पाहता आले आहे. कोरोना नंतरही जगाला पाहता येणार आहे. दोन्ही कालखंडाकडे पाहिल्यास एकविसावे शतक भारताचे असावे, यासाठी आपली जबाबदारी आहे, असे मोदी यांनी सांगितले.

CoronaVirus: Narendra modi announce total 20 lakhs crore package hrb | स्वावलंबी भारत होवो! एकूण २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

स्वावलंबी भारत होवो! एकूण २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

Next

नवी दिल्ली : ४२ लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनामुळे संक्रमित झाले आहेत. पावणे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्येही अनेक कुटुंबांनी त्यांचे सदस्य गमावले आहेत. त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केले आहे. करोडो लोक संकटाचा सामना करत आहेत. आम्ही असे संकट ना पाहिलेय नाही ऐकले. हे कल्पनेपलिकडचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच मोदींनी जीडीपीच्या १० टक्के आर्थिक पॅकेजची घोषणा केली. 


नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केले आहे. करोडो लोक संकटाचा सामना करत आहेत. आम्ही असे संकट ना पाहिलेय नाही ऐकले. हे कल्पनेपलिकडचे आहे. आम्हाला कोरोनाआधीच्या जगाला पाहता आले आहे. कोरोना नंतरही जगाला पाहता येणार आहे. दोन्ही कालखंडाकडे पाहिल्यास एकविसावे शतक भारताचे असावे, यासाठी आपली जबाबदारी आहे. यासाठी एकच मार्ग आहे स्वावलंबी भारत. शास्त्रामध्येही हेच सांगितले आहे, असे मोदी म्हणाले.  

जेव्हा कोरोना संकट सुरु झाले तेव्हा भारतात एकही पीपीई किट बनत नव्हती. एन-९५ मास्कचे नाममात्रच उत्पादन होत होते. आज भारतात रोज दोन लाख पीपीई आणि मास्क बनविले जाऊ लागले आहेत. संकटाला संधीमध्ये बदलण्यात आले आहे. हे भारताला ताकदवान बनविण्यास मदत करणार आहे, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. 


भारत जेव्हा स्वावलंबी होण्याची गोष्ट करतो, तेव्हा त्याची वकीली करत नाही. जी संस्कृती जगाचा विकास करू इच्छिते. जगाला घर मानते. भारताच्या कामाचा प्रभाव जगाच्या कल्याणावर पडतो. टीबी असेल, हागणदारी मुक्ती असेल जगावर त्याचा परिणाम झाला आहे. तणावातून मुक्ती देण्यासाठी भारताकडून जगाला भेट मिळाली आहे. जगाला विश्वास वाटू लागला आहे, भारत काही चांगले करू शकतो. पण प्रश्न आहे कसा? यावर उत्तर आहे १३५ कोटी लोकांनी केलेला स्वावलंबीपणाचा संकल्प यावर उत्तर आहे, असे मोदी म्हणाले. 


जगाला या शतकाच्या सुरुवातीला वायटूकेने ग्रासले होते. तेव्हा भारतीय तंत्रज्ञानेच जगाला वाचविले होते. आम्ही भारतातील तंत्रज्ञान सुधारु, मालवाहतूक सुधारू, दर्जेदार उत्पादने घेऊ. कच्छचा भूकंप पाहिलाय. काही उरले नव्हते, तरीही कच्छ पुन्हा उभे राहिले. भारत स्वावलंबी बनू शकतो. ही इमारत पाच खांबावर उभी राहील. पहिला खांब अर्थव्यवस्था. दुसरा खांब इन्फ्रास्ट्रक्चर, तिसरा खांब आपली व्यवस्था तीही तंत्रज्ञानावर आधारीत, चौथा खांब लोकसंख्याशास्त्र आणि पाचवा खांब मागणी. यावर काम करावे लागणार आहे. या सर्व खांबांना आपण मजबूत करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


याचबरोबर मी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करतो. स्वावलंबी भारत मोहिमेसाठी हे पॅकेज काम करेल. गेल्या काळात आर्थिक पॅकेज दिले होते. त्याला आणि आजच्या पॅकजला जोडले तर जवळपास २० लाख कोटी रुपयांचे आहे. भारताच्या जीडीपीच्या जवळपास १० टक्के आहे. या पॅकेजमध्ये जमीन, कामगार यावर लक्ष देऊन बनविण्यात आले आहे. यामध्ये कुटीर उद्योग, लघू, मध्यम उद्योग यासाठी आहे. हे पॅकेज देशाच्या श्रमिक, शेतकऱ्यासाठी आहे, असे मोदींनी सांगितले. 

लोकलसाठी व्होकल बना, स्थानिक उत्पादनं खरेदी करा, भारतीय उत्पादनं खरेदी करा. सुधारणा राबवणं हे महत्वाचं, सुधारणा राबवल्यामुळेच संकटात टिकलोय, कुणी विचार केला होता शेतकऱ्यांना थेट पैसे मिळतील, हेही त्यावेळेस झालंय ज्यावेळेस सगळं बंद होतं, सुधारणा आता आणखी वाढवाव्या लागतील, असे मोदी यांनी सांगितले. 

महत्वाच्या बातम्या...

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदार पुत्राची महामार्गावर घोडेस्वारी

CoronaVirus तळीरामांचे फावले! ऑर्डर दिल्यावर राज्यात दारु घरपोच मिळणार

चीनने युआनचे अवमुल्यन केले तर? अभिजीत बॅनर्जींनी सांगितले अर्थकारण

CoronaVirus अमेरिकेतील भारतीय मोठ्या संकटात; नोकरी गेली, एअर इंडियानेही नाकारले

Web Title: CoronaVirus: Narendra modi announce total 20 lakhs crore package hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.