Coronavirus: गावाकडे निघालेल्या लाखो नागरिकांना पंतप्रधानांचा महत्त्वाचा संदेश; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 08:58 PM2020-03-21T20:58:21+5:302020-03-21T21:00:30+5:30

शहरांमध्ये शट डाऊन केल्याने लोकांना गावाकडे जाण्याचा पर्याय स्विकारला आहे.

Coronavirus: Narendra Modi important message for citizens going village hrb | Coronavirus: गावाकडे निघालेल्या लाखो नागरिकांना पंतप्रधानांचा महत्त्वाचा संदेश; म्हणाले...

Coronavirus: गावाकडे निघालेल्या लाखो नागरिकांना पंतप्रधानांचा महत्त्वाचा संदेश; म्हणाले...

Next

नवी दिल्ली : कोरोनाला घाबरून गावी जाऊ नका, तुम्ही जिथे नोकरी करता, ज्या शहरात राहता तिथेच रहा असे कळकळीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. कोरोनाच्या संक्रमित रुग्णांचा आकडा ३०० वर जाऊन पोहोचला असून तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून हे आवाहन केले आहे. माझी सर्वांना प्रार्थना आहे की, तुम्ही ज्या शहरात आहात त्याच शहरात रहा. आपण कोरोनाला रोखू शकतो. रेल्वे स्थानके, बस स्थानकांवर गर्दी करून आपण आपल्या आरोग्याशी खेळ करत आहोत. कृपया तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी करा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असे आवाहन मोदी यांनी केले आहे.

शहरांमध्ये शट डाऊन केल्याने लोकांना गावाकडे जाण्याचा पर्याय स्विकारला आहे. यामुळे कोरोना देशभरात पसरण्याचा धोका मोदी यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक बहीण-भाऊ शहरे सोडून त्यांच्या गावी जात आहेत. गर्दीमध्ये प्रवास करून काय साध्य होणार आहे. उलट धोका आणखी वाढेल. तुम्ही जिथे जाताय तेथील लोकांनाही कोरोनाची लागण होऊ शकते. तुम्ही तुमच्या गावात आणि कुटुंबाची संकटे वाढविणार आहात असा इशारा मोदी यांनी दिला आहे.

 

Video: तुमचे एक मिनिट Corona चा प्रसार थांबवेल! मोदींनी तरुणांना केले आवाहन

अखेर चीनला उपरती; वुहानमधील 'त्या' डॉक्टरच्या कुटुंबाची मागितली माफी

Web Title: Coronavirus: Narendra Modi important message for citizens going village hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.