coronavirus: राष्ट्रवादी काँग्रेसने केलं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचं कौतुक, अशी दिली कामाची पोचपावती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 03:44 PM2020-05-25T15:44:31+5:302020-05-25T15:45:52+5:30
श्रमिक स्पेशल ट्रेनवरून सध्या राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि रेल्वेमंत्रालय आमनेसामने आले आहेत. मात्र राज्यात शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र रेल्वेमंत्री रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
मुंबई - स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेनवरून सध्या राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि रेल्वेमंत्रालय आमनेसामने आले आहेत. मात्र राज्यात शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र रेल्वेमंत्री रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच ही वेळ टीका-टिप्पणीची नाही, असेही म्हटले आहे.
राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर सध्या देशभरात रेल्वेगा्ड्या सोडण्यासाठी दबाव आहे. त्यांच्या प्रयत्नांची दाद देऊन सन्मान केला पाहिजे. मजुरांना घरी जाण्यासाठी ते ट्रेन उपलब्ध करून देत आहेत. त्याचे कौतुक झाले पाहिजे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेमंत्र्यांचे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यामध्ये रंगलेले ट्विटर युद्ध चांगलेच पेटले आहे. या वादात आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. यादी कसली मागताय? तुम्ही राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहात, हे विसरू नका अशा शब्दांत संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
श्रमिक स्पेशल ट्रेन पुन्हा एकदा रस्ता चुकली, बलियाऐवजी नागपूरला पोहोचली
पहिल्याच दिवशी विमानसेवेचा बोजवारा, दिल्ली, मुंबईतून जाणारी अनेक विमाने रद्द, प्रवाशांना मनस्ताप
कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई
लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती
रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष
पीयूष गोयल यांनी महाराष्ट्र राज्यासाठी १२५ ट्रेन देण्यासाठी तयार आहोत, असे सांगत राज्य सरकारने अडकलेल्या मजुरांची यादी एका तासात रेल्वेला पाठविण्याचे आवाहन ट्विटद्वारे केले होते. त्यानंतर रात्री दोन वाजता पुन्हा त्यांनी ट्विट करत १२५ श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्याची आपली तयारी असताना फक्त ४६ ट्रेनची यादी आपल्याला मिळाली, असा दावा करत पीयूष गोयल यांनी राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "१४ मे २०ला सुटलेल्या नागपुर - उधमपूर ट्रेनसाठी कोणती यादी घेतली होती. आधी ट्रेन नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले. कृपया जाहीर कराल? आता मग यादी कसली मागताय? राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका." असेही राऊत यांनी गोयल यांना सुनावले.