CoronaVirus : नियम बदलले! जाणून घ्या, विमानतळ प्रशासनाच्या प्रवाशांसाठी नव्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 01:01 PM2020-05-21T13:01:52+5:302020-05-21T13:08:19+5:30
तसेच प्रवाशांनी त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करून ठेवणे बंधनकारक केले आहे.
नवी दिल्ली: कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असून, भारताला त्याचा फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटापायी देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून, सर्वच उद्योगधंदे ठप्प आहेत. रेल्वे आणि विमानसेवाही बंद आहे. पण केंद्र सरकारनं आता 25 मेपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व खबरदारी घेत विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) गुरुवारी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याअंतर्गत विमानतळ टर्मिनल इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांना थर्मल चेक मशीनमधून जाणे बंधनकारक असेल. तसेच प्रवाशांनी त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करून ठेवणे बंधनकारक केले आहे. विमानतळावर जाण्यापूर्वी अशा काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाच्या आहेत.
विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) प्रवाशांसाठी जारी केल्या मार्गदर्शन सूचना
- प्रवाशांनी विमान सुटण्याच्या वेळेच्या दोन तास आधी पोहोचले पाहिजे.
- ज्यांची उड्डाणे चार तासांच्या आत असतील, त्या प्रवाशांना टर्मिनल इमारतीत जाण्याची परवानगी देण्यात येईल.
- सर्व प्रवाशांनी मास्क आणि हातमोजे घालणे आवश्यक आहे.
- प्रवाशांना थर्मल स्क्रीनिंग करावी लागणार आहे.
- प्रवाशांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ऍप असणे महत्त्वाचे आहे.
- 14 वर्षांखालील मुलांना आरोग्य सेतू अॅपमधून सूट देण्यात आली आहे.
- जर त्यांच्याकडे 'ग्रीन' पर्याय दिसत नसेल किंवा त्यांच्याकडे शासकीय संपर्क ट्रेसिंग अॅप नसेल तर त्यांना प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
- विशिष्ट प्रकरणांशिवाय प्रवाशांच्या ट्रॉलीला मंजुरी दिली जाणार नाही. यासाठी निर्जंतुकीकरण देखील करावे लागेल.
- राज्य सरकारे आणि प्रशासनाने प्रवासी आणि एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक आणि खासगी टॅक्सी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
- केवळ खासगी वाहने किंवा निवडक कॅब सेवांना प्रवाशांना आणि कर्मचार्यांना विमानतळावर नेण्याची परवानगी असेल.
नागरी उड्डयन मंत्री म्हणाले की, उड्डाणे कमी होऊ शकतात, विमानातील काही जागा रिक्त ठेवून उड्डाण करणं व्यावहारिक ठरणार नाही, कारण यामुळे तिकिटांच्या किमती वाढतील. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं असून, 25 मार्चपासून देशातील सर्व व्यावसायिक प्रवासी उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.
स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आणि ते म्हणाले की, “25 मेपासून देशांतर्गत उड्डाण सेवा सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.” हा निर्णय देशातील सर्वांगीण आर्थिक वातावरणाला बळकटी देण्यासाठी दूरगामी सिद्ध होईल. ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी एसओपी आणि उड्डाणांच्या तपशीलांची अद्याप प्रतीक्षा आहे, परंतु आम्हाला विश्वास आहे की, ही बहुप्रतीक्षित वाटचाल मोठ्या संख्येने प्रवाशांना सुरक्षित आणि जलद वाहतुकीची सुविधा देईल.
हेही वाचा
नोकियाचा वर्ल्ड रेकॉर्ड; प्रतिस्पर्धी कंपन्यांना धोबीपछाड
देशाच्या सार्वभौमत्व अन् प्रादेशिक अखंडतेत कोणतीही तडजोड नाही, भारतानं नेपाळला सुनावलं
पाकला चुना! चिनी कंपन्यांनी 60 अब्जांची गुंतवणूक करून कमावला 400 अब्ज रुपयांचा नफा
...म्हणून चीन अफवा पसरवतो, डोनाल्ड ट्रम्प यांनी साधला निशाणा
एका कुटुंबाला कचऱ्यात सापडल्या दोन बॅगा अन् उघडून पाहतात तर काय...
CoronaVirus News : चीन अन् इटलीच्या तुलनेत भारतातून येणारा कोरोना 'प्राणघातक', नेपाळच्या PMची टीका