Coronavirus: ओमायक्रॉनच्या संसर्गाचं नवं लक्षण, केवळ रात्रीच्या वेळीच दिसतं, डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 12:47 PM2021-12-12T12:47:10+5:302021-12-12T12:47:19+5:30

Coronavirus: कोरोनाचा नवा Omicron Variant जगासमोर नवे आव्हान बनून समोर आला आहे. त्याचे गांभीर्य, संसर्गाचा वेग आणि लक्षणांबाबत वेगवेवळे दावे करण्यात येत आहे.

Coronavirus: New sign of omecron infection, seen only at night, doctor warns of danger | Coronavirus: ओमायक्रॉनच्या संसर्गाचं नवं लक्षण, केवळ रात्रीच्या वेळीच दिसतं, डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा

Coronavirus: ओमायक्रॉनच्या संसर्गाचं नवं लक्षण, केवळ रात्रीच्या वेळीच दिसतं, डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा

googlenewsNext

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने सध्या जगाची चिंता वाढवली आहे. एका व्हायरल इन्फेक्शनमधील धोकादायक बाब ही त्याची गंभीरता असते. कोविड-१९ च्या डेल्टा व्हेरिएंटने भारतासह संपूर्ण जगभरात थैमान घातले होते. डेल्टाच्या संसर्गाचा वेग खूप अधिक होता. यामध्ये रुग्णांना सौम्य आणि गंभीर अशी दोन्ही लक्षणे दिसत होती. त्यामध्ये तीव्र ताप, खोकला. श्वास घेण्यास त्रास, छातीमध्ये वेदना, रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता यासारखी लक्षणे दिसत होती. आता कोरोनाचा नवा ओमायक्रॉन व्हेरिएंट जगासमोर नवे आव्हान बनून समोर आला आहे. त्याचे गांभीर्य, संसर्गाचा वेग आणि लक्षणांबाबत वेगवेवळे दावे करण्यात येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा दावा आहे की, कोरोनाचा नवा ओमायक्रॉन व्हेरिएंट आधी संसर्ग झालेल्या लोकांनाही सहजपणे बाधित करतो. त्याशिवाय लसीचे दोन डोस घेतलेले लोकसुद्दा ओमायक्रॉनपासून सुरक्षित नाही आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट नेमका किती धोकादायक आहे, हे स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत जगभरातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञ ओमायक्रॉन व्हेरिएंटची वेगवेगळी लक्षणे दिसल्याचा दावा करत आहेत.

दक्षिण आफ्रिकेमधील आरोग्य विभागाच्या जनरल प्रॅक्टिशनर डॉ. उनबेन पिल्ले यांनी सांगितले की, ओमायक्रॉनपासून बाधित झालेल्या रुग्णांना रात्रीच्या वेळी घाम येण्याची समस्या जाणवू शकते. अनेकदा रुग्णाला एवढा जास्त घाम येतो की, त्यामुळे त्याचे कपडे किंवा अंथरुणही ओले होऊ शकते. बाधिताला थंड जागेवर राहिल्यावरही घाम येऊ शकतो. त्याशिवाय रुग्णाच्या शरीरामध्ये वेदनांची तक्रारही जाणवू शकते.

याशिवाय कोरडा खोकला आणि शरीरामध्ये वेदना, घशामध्ये खवखवीऐवजी ओरखडे पडणे, सौम्य ताप, थकवा अशी लक्षणेही दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष न तरता त्वरित कोविड-१९ ची चाचणी करून घ्या.    

Web Title: Coronavirus: New sign of omecron infection, seen only at night, doctor warns of danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.