देशात नव्या कोरोना स्ट्रेनची पुष्टी; भारत-इंग्लंडदरम्यानची उड्डाणे 31 डिसेंबरनंतरही राहणार रद्द, उड्डाणमंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 04:21 PM2020-12-29T16:21:52+5:302020-12-29T16:23:16+5:30

नागरी उड्डाण मंत्रालयाने कोरोना व्हायरसचा नवा प्रकार (स्ट्रेन) सामोर आल्याच्या पार्श्वभूमीवर 23 ते 31 डिसेंबरपर्यंत भारत आणि इंग्लंडदरम्यानची उड्डाणे स्थगित केली आहेत.

CoronaVirus New strain I foresee slight extension of temporary suspension of india uk flights says aviation minister hardeep singh puri | देशात नव्या कोरोना स्ट्रेनची पुष्टी; भारत-इंग्लंडदरम्यानची उड्डाणे 31 डिसेंबरनंतरही राहणार रद्द, उड्डाणमंत्र्यांचे संकेत

देशात नव्या कोरोना स्ट्रेनची पुष्टी; भारत-इंग्लंडदरम्यानची उड्डाणे 31 डिसेंबरनंतरही राहणार रद्द, उड्डाणमंत्र्यांचे संकेत

Next

नवी दिल्ली -इंग्लंडमधून भारतात आलेल्या 6 प्रवाशांत कोरोना व्हायरसचे नवे स्वरूप (स्ट्रेन) आढळून आले आहे. यातच आता, भारत आणि इंग्लंडदरम्यान रद्द करण्यात आलेली विमान सेवा आणखी काही दिवस रद्दच ठेवावी लागेल, असे मलावाटते, असे नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. 

नागरी उड्डाण मंत्रालयाने कोरोना व्हायरसचा नवा प्रकार (स्ट्रेन) सामोर आल्याच्या पार्श्वभूमीवर 23 ते 31 डिसेंबरपर्यंत भारत आणि इंग्लंडदरम्यानची उड्डाणे स्थगित केली आहेत. आता 31 डिसेंबरनंतरही ही उड्डाणे रद्दच राहू शकतात. इंग्लंडमध्ये आढळून आलेला कोरोना व्हायरसचा हा नवा प्रकार अत्यंत वेगाने पसरत चालला आहे. एवढेच नाही, तर तो अधिक संक्रमक असल्याचेही बोलले जात आहे.

सहा जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण -
इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात कहर केला असतानाच आता भारतातही नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर येत आहे. इंग्लंडमधून भारतात परतलेल्या 6 जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारने आज (मंगळवारी) दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमधून परतलेल्या 6 जणांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाली आहे. यामध्ये 3 नमुने बेंगळुरू, 2 नमुने हैदराबाद आणि 1 नमुना पुण्यातील प्रयोगशाळेतील असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.  

कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेल्या सर्व 6 जणांना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच या 6 जणांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले असून, अन्य सहप्रवाशांचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 

देशभरातील प्रयोगशाळांमध्ये तपासणी सुरू -
आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत इंग्लंडहून सुमारे 33 हजार प्रवासी भारतात आले आहेत. सर्वांची तपासणी करण्यात आली. यातील 114 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर देशभरातील सुमारे 10 प्रयोगशाळांमध्ये हे नमुने पाठवण्यात आले असून, यात कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरू, एनआयएमएचएएनएस बंगळुरू, आयजीआयबी दिल्ली आणि एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांचा समावेश आहे. 

इंग्लंडमधील शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, कोरोनाच्या नवीन प्रकाराचा फैलाव 70 टक्के अधिक वेगाने होतो. आतापर्यंत जगभरातील 16 देशांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झाला आहे. नव्या प्रकारच्या कोरोनाला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी इंग्लंडमुधून होणारी विमान उड्डाणे स्थगित केली आहे.
 

Web Title: CoronaVirus New strain I foresee slight extension of temporary suspension of india uk flights says aviation minister hardeep singh puri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.