CoronaVirus News: कोरोनाचा नवा स्ट्रेन हातपाय पसरतोय; २० भारतीयांमध्ये लक्षणं दिसल्यानं चिंतेत भर
By कुणाल गवाणकर | Published: December 30, 2020 12:07 PM2020-12-30T12:07:26+5:302020-12-30T12:09:32+5:30
CoronaVirus News: कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे आरोग्य विभाग हाय अलर्टवर
नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आता भारतात हातपाय परत असल्याचं दिसू लागलं आहे. ब्रिटनहून आलेल्या २० प्रवाशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. याआधी काल दिवसभरात देशाच्या विविध भागांमध्ये ६ जणांना नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे आरोग्य विभागाची धाकधूक वाढली आहे. त्यातच ब्रिटनहून आलेल्या अनेक प्रवाशांशी संपर्क होत असल्यानं चिंतेत भर पडली आहे.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेननं टेन्शन वाढवलं; मोदी सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय
देशाच्या विविध भागांमध्ये नव्या स्ट्रेनचे रुग्ण
पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात नव्या स्ट्रेनची लागण झालेला कोरोना रुग्ण आढळून आला आहे. ब्रिटनहून आलेल्या एका व्यक्तीमध्ये नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आली आहेत. त्याला क्वारंटिन करण्यात आलं आहे. जीनॉम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून या प्रवाशाची माहिती प्रशासनाला मिळाली. तो गेल्याच आठवड्यात ब्रिटनहून परतला आहे.
कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी राज्यात ७ जणांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आल्याची माहिती दिली. यातील ३ जण बंगळुरूचे, तर ४ जण शिमोगाचे रहिवासी आहेत. या ७ जणांच्या संपर्कात आलेल्या काही जणांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे.
भय इथले संपत नाही! 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन
काल उत्तर प्रदेशातल्या मेरठमधील एका २ वर्षीय मुलीला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची बाधा झाल्याचं समोर आलं. या चिमुरडीचं कुटुंब नुकतंच ब्रिटनमध्ये परतलं आहे. त्यानंतर चिमुकलीसह तिचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. मात्र तिघांपैकी केवळ लहान मुलीमध्येच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.