CoronaVirus News: प्रादुर्भाव वाढला! एका दिवसात वाढले १७ हजार २९६ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 04:02 AM2020-06-27T04:02:14+5:302020-06-27T04:02:37+5:30

काही देशांत रुग्णांची संख्या भारतापेक्षा बरीच कमी आहे, पण तिथे मरण पावलेल्यांचा आकडा खूपच अधिक आहे.

CoronaVirus News: 17 thousand 296 patients increased in one day | CoronaVirus News: प्रादुर्भाव वाढला! एका दिवसात वाढले १७ हजार २९६ रुग्ण

CoronaVirus News: प्रादुर्भाव वाढला! एका दिवसात वाढले १७ हजार २९६ रुग्ण

Next

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत १७ हजार २९६ रुग्ण आढळले असून, एका दिवसात इतके रुग्ण वाढण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. त्यामुळे एकूण कोरानाबाधितांचा आकडा आता ४ लाख ९0 हजार ४0१ झाला असून, आतापर्यंत या आजाराने १५ हजार ३0१ जण मरण पावले आहेत.
रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत असून, हाच वेग कायम राहिल्यास शनिवार सकाळपर्यंत देशातील रुग्णांची संख्या ५ लाखांहून अधिक झालेली असेल. जगात अमेरिका, रशिया, ब्राझील या देशांनंतर सर्वाधिक रुग्ण भारतामध्ये आहेत. काही देशांत रुग्णांची संख्या भारतापेक्षा बरीच कमी आहे, पण तिथे मरण पावलेल्यांचा आकडा खूपच अधिक आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात ४0७ रुग्ण मरण पावले. देशात १ जूनपासून आतापर्यंत २ लाख ९९ हजार ८६६ म्हणजेच सुमारे तीन लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून रोज १0 हजारांहून अधिक रुग्ण दिसून येत होते. तिसºया आठवड्यांनंतर दरदिवशी १४ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आहे. पण आतापर्यंत १७ हजारांचा आकडा कधीच ओलांडला नव्हता. आतापर्यंतच्या एकूण रुग्णांपैकी २ लाख ८५ हजार ६३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सध्या १ लाख ८९ हजार ४६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ५८. २४ टक्के असून, मृत्युदर जगातील अनेक देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. गेल्या २४ तासांत मरण पावलेल्यांपैकी १९२ जण महाराष्ट्रातील आहेत. राज्यात आतापर्यंत ६९३१ जण कोरोनाचे बळी ठरले आहेत.
>तमिळनाडूत मृत्युदर कमी
देशात सर्वाधिक रुग्णही महाराष्ट्रामध्येच आहेत. त्याखालोखाल दिल्ली, तमिळनाडू व गुजरात यांचा क्रमांक लागतो. दिल्ली व तमिळनाडूमध्ये ७0 हजारांहून अधिक, तर गुजरातमध्ये २९ हजार ५00 रुग्ण आहेत. दिल्लीमध्ये आतापर्यंत २४२९, गुजरातमध्ये १७५३, तर तमिळनाडूमध्ये ९११ जण मरण पावले आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत तमिळनाडूचा मृत्युदर गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश यांच्यापेक्षा बराच कमी आहे.

Web Title: CoronaVirus News: 17 thousand 296 patients increased in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.