Coronavirus News: देशात २ लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद; मृतांच्या संख्येत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 11:42 AM2021-05-27T11:42:25+5:302021-05-27T11:45:00+5:30

देशभरात आतापर्यंत २ कोटी ४६ लाख ३३ हजार ९५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

Coronavirus News: 211298 new corona cases and 3847 deaths in last 24 hrs in india | Coronavirus News: देशात २ लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद; मृतांच्या संख्येत घट

Coronavirus News: देशात २ लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद; मृतांच्या संख्येत घट

Next

नवी दिल्ली: देशात दिवसभरात २ लाख ११ हजार २९८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ७३ लाख ६९ हजार ०९३ वर पोहचली आहे. देशात सध्या २४ लाख १९ हजार ९०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आज (सोमवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयानं जाहीर केली आहे.

देशातील परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. तसेच गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मृतांचा आकडा देखील आज कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत ३८४७ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे, आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची एकूण संख्या ३ लाख १५ हजार २३५वर पोहचली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ७३ लाख ६९ हजार ०९३ वर पोहचली आहे. तर याच २४ तासांत तब्बल २ लाख ८३ हजार १३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच देशभरात आतापर्यंत २ कोटी ४६ लाख ३३ हजार ९५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

देशात कोरोनामुळे मृत्यूदर १.५ टक्क्यांवर आहे, तर रिकव्हरी रेट ८९ टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन १० टक्क्यांहून कमी झाली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येबाबत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. 

२६ मेपर्यंत देशभरात २० कोटी २६ लाख ९५ हजार ८७४ कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. बुधवारी दिवसभरात १८ लाख ८५ हजार ८०५ लसीचे डोस देण्यात आले. तर आतापर्यंत ३३ कोटी ७० लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी दिवसभरात २२ लाख कोरोना चाचणीचे अहवाल तपासण्यात आले. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ९ टक्क्यांहून अधिक आहे. 

Web Title: Coronavirus News: 211298 new corona cases and 3847 deaths in last 24 hrs in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.