Corona Virus : बापरे! अवघ्या 29 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण; आरोग्य विभागात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 06:25 PM2023-01-07T18:25:24+5:302023-01-07T18:34:14+5:30
CoronaVirus News : अवघ्या 29 दिवसांचं बाळ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहेत. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. अवघ्या 29 दिवसांचं बाळ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या फिल्लौर भागात ही घटना घडली आहे. बाळाच्या नातेवाईकांनी बाळाला तपासणीसाठी रुग्णालयात आणलं होतं. एका खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी त्याची रॅपिड टेस्ट करण्यात आली. रॅपिड टेस्टमध्ये त्याला कोरोना असल्याची पुष्टी झाली. रुग्णाच्या नातेवाईकांनी मुलाला उपचारासाठी लुधियानाच्या दीप रुग्णालयात नेले आहे.
आईमध्येही कोरोनाची लक्षणे
सिव्हिल सर्जन डॉ. रमण शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाचे पथक मुलाच्या नातेवाईकांशी संपर्क साधत आहेत. मुलाच्या आईला ताप आणि कोरोनाची लक्षणे होती. त्यांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जाईल. त्याच वेळी, आरोग्य विभाग लुधियानाच्या टीमला बाळाची आरटीपीसीआर चाचणी घेण्यास सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 81,157 वर पोहोचली आहे.
लहान मुलांना होणारे आजार लवकर शोधण्यासाठी विभागाचे पथक वर्षातून एकदा शाळा आणि दोनदा अंगणवाडी केंद्रात मुलांची आरोग्य तपासणी करतात. सिव्हिल सर्जन डॉ. रमण शर्मा यांनी राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत तैनात करण्यात आलेल्या पथकांची बैठक घेतल्यानंतर मुलांची 100 टक्के आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"