CoronaVirus News: भारतात कोरोना विषाणूचे ७५६९ उत्परिवर्तित प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 02:08 AM2021-02-21T02:08:14+5:302021-02-21T06:52:28+5:30
सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीमधील शास्त्रज्ञांनीच कोरोना विषाणूच्या ५ हजारांहून अधिक उत्परिवर्तित प्रकारांचे विश्लेषण केले आहे
हैदराबाद : चीनमधील वुहान येथे कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत भारतामध्ये कोरोना विषाणूचे ७,५६९ उत्परिवर्तित प्रकार अस्तित्वात आले. त्यांचे भारतीय शास्त्रज्ञांनी विश्लेषण केले आहे.
सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीमधील शास्त्रज्ञांनीच कोरोना विषाणूच्या ५ हजारांहून अधिक उत्परिवर्तित प्रकारांचे विश्लेषण केले आहे. उर्वरित कोरोना विषाणूंचा अन्य संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. ही उत्परिवर्तन कशी झाली याची कारणेही शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहेत.
अधिक संसर्गशक्ती असलेले कोरोनाचे नवे विषाणू जगात ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलसारख्या देशांत सापडले आहेत. सीसीएमबीचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी सांगितले की, भारतात आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या ई४८४ के, एन५०१वाय या उत्परिवर्तित प्रकारांमध्ये थोडी जास्त संसर्गशक्ती असली तरी ते घातक नाहीत.