CoronaVirus News: ९५ वर्षांच्या कोरोनाबाधित आजीबाई झाल्या पूर्ण बऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 04:53 AM2020-05-02T04:53:59+5:302020-05-02T04:53:59+5:30
केरळमधीलच अनुक्रमे ९३ व ८८ वर्षांचे एक कोरोनाबाधित दाम्पत्य गेल्या महिन्यात पूर्णपणे बरे होऊन घरी गेले होते.
करुर (केरळ) : येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात तीन आठवड्यांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या ९५ वर्षांच्या एका कोरोनाबाधित आजीबार्इंना पूर्ण बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. पूर्णपणे बरा झालेला देशातील हा सर्वाधिक वयाचा कोराना रुग्ण असावा, असे येथील डॉक्टरांना वाटते. केरळमधीलच अनुक्रमे ९३ व ८८ वर्षांचे एक कोरोनाबाधित दाम्पत्य गेल्या महिन्यात पूर्णपणे बरे होऊन घरी गेले होते.
नमक्कल आणि दिंडीगल या दोन शेजारी जिल्ह्यांमधील कोरोनाचे रुग्ण करुर येथील इस्पितळात दाखल केले जातात. बरी झालेली ही ९५ वर्षांची वृद्धा दिंडीगल जिल्ह्यातील होती. बºया झालेल्या एकूण पाच रुग्णांना बुधवारी सायंकाळी घरी पाठविण्यात आले. त्यात तिचा समावेश होता.
या वृद्धेचा मुलगा सैयद इब्राहीम याने सांगितले की, आमच्या शेजारचा एक मुलगा दिल्लीहून तबलगी जमातच्या कार्यक्रमाला जाऊन परत आला. तेथून आलेले बरेचजण कोरानाग्रस्त झाल्याचे कळल्यानंतर आम्ही घरातील सर्वांनी जाऊन चाचण्या करून घेतल्या. आई वगळता इतर सर्वांच्या चाचण्या ‘निगेटिव्ह’ आल्या. इब्राहिम म्हणाला की, घरातील फक्त आईलाच कोरोनाचा संसर्ग व्हावा याचे आश्चर्य वाटते.
इस्पितळाचे अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. तेरानीरंजन म्हणाले की, या आजीबार्इंचे मनोधैर्य नक्कीच कौतुक करण्यासारखे आहे. त्या मनाने खंबीर राहिल्या व कोणतीही कुरकूर न करता त्यांनी उपचार करून घेतले म्हणूनच त्या लवकर बºया झाल्या.
>या आजारातून पूर्ण बरी होईन, असा मला पूर्ण आत्मविश्वास होता. घरातील सर्व आणि डॉक्टर व अन्य कर्मचारी माझी आस्थेने काळजी घेत होते. त्यामुळे मला बिलकूल चिंता किंवा भीती वाटली नाही.
-बºया झालेल्या आजीबाई