CoronaVirus News: कोरोनापासून बचाव करायचाय? मग 'या' तीन गोष्टी जवळ करा; आयुष मंत्रालयाचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 01:58 AM2020-10-07T01:58:54+5:302020-10-07T07:04:54+5:30

CoronaVirus News: कोरोना विषाणूची बाधा झाल्यास जर योग्य व्यवस्था केली गेली, तर रुग्ण बरा झाल्यास तो त्याची प्रतिकारशक्ती उत्तम करू शकतो.

CoronaVirus News: Ayurveda, Yoga, Successful Attack on Corona with Turmeric Milk - Ministry of AYUSH | CoronaVirus News: कोरोनापासून बचाव करायचाय? मग 'या' तीन गोष्टी जवळ करा; आयुष मंत्रालयाचा मोलाचा सल्ला

CoronaVirus News: कोरोनापासून बचाव करायचाय? मग 'या' तीन गोष्टी जवळ करा; आयुष मंत्रालयाचा मोलाचा सल्ला

Next

- एस.के. गुप्ता 

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाने प्रयोग पद्धतीच्या आधारावर कोरोनाविरोधातील युद्धात आयुर्वेद आणि योग यांना फार महत्त्व आहे, अशी घोषणा केली आहे. कोरोना विषाणूची बाधा झाल्यास जर योग्य व्यवस्था केली गेली, तर रुग्ण बरा झाल्यास तो त्याची प्रतिकारशक्ती उत्तम करू शकतो.

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी म्हटले की, ‘आयुर्वेद आणि योग व्यवस्थेदरम्यान लोकांनी सहा फूट अंतर आणि मास्क घालण्याच्या नियमांचे पालन कठोरपणे करावे. हे पालन सध्या लोक करीतच आहेत. कारण आयुर्वेद आणि योगा कोरोनाविरोधातील युद्धात तुम्हाला बळकट बनवू शकतो.’

कोटेचा म्हणाले की, ‘कोरोनापासून वाचण्यासाठी आणि व्यवस्थेसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व आयुष राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत कोविड-१९ च्या व्यवस्थेसाठी मंगळवारी आयुर्वेद आणि योग आधारित राष्ट्रीय नैदानिक व्यवस्थापन प्रोटोकॉल जारी केला गेला. यानिमित्त नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आणि नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

Web Title: CoronaVirus News: Ayurveda, Yoga, Successful Attack on Corona with Turmeric Milk - Ministry of AYUSH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.