CoronaVirus News : बंगळुरू २0 दिवस बंद ठेवा : कुमारस्वामी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 03:58 AM2020-06-24T03:58:21+5:302020-06-24T03:58:38+5:30

राज्य सरकारने बंगळुरूमध्ये लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केली आहे.

CoronaVirus News: Bangalore closed for 20 days: Kumaraswamy | CoronaVirus News : बंगळुरू २0 दिवस बंद ठेवा : कुमारस्वामी

CoronaVirus News : बंगळुरू २0 दिवस बंद ठेवा : कुमारस्वामी

Next

बंगळुरू : कोरोनाच्या वाढत्या प्रादुभावामुळे काही ठिकाणे सील करण्याऐवजी कर्नाटकची राजधानी असलेले बंगळुरू शहर पुढील २0 दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात यावे. त्यासाठी राज्य सरकारने बंगळुरूमध्ये लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केली आहे.
काही वस्त्या, इमारती वा झोपडपट्ट्या सील केल्याने कोरोनाचा फैलाव थांबेल, अशा भ्रमात राहून चालणार नाही. त्याऐवजी संपूर्ण शहरांत लॉकडाऊ न लागू करावा आणि त्याबरोबरच गरिबांना सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी. अन्यथा त्यांचे हाल होतील, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. लोकांच्या जीवाशी सरकारने खेळू नये. तुम्हाला लोकांच्या जीवाची खरोखरच काळजी असेल, तर बंगळुरू शहरातील सर्व व्यवहार २0 दिवसांसाठी बंद करणे, हाच खरा उपाय आहे. अन्यथा बंगळुरूची अवस्था ब्राझीलप्रमाणे झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही माजी मुख्यमंत्र्यांनी सरकारला दिला आहे. गेल्या काही दिवसांत ब्राझीलमध्ये कोरोनाने थैमान घतले असून, तिथे रुग्ण आणि मृत्यू यांचे प्रमाण वाढत आहे. आम्ही ड्रायव्हर्स, धोबी, हातमाग कामगार यांना मदत करीत असल्याच्या घोषणा राज्य सरकार करीत आहे. पण त्यांना कोणतीही मदत अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे सुमारे ५0 लाख गरीब मजूर व बेकारांना ताबडतोबीने प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याकडे केली आहे.
>कर्नाटकात आतापर्यंत ९३९९ रुग्ण आढळले असून, मरण पावलेल्यांची एकूण संख्या १४२ झाली आहे. बंगळुरू, कलबुर्गी, उडुपी, विजयपुरा, दक्षिण कन्नडा, चिक्कमंगळुरू, दावणगिरी, बागलकोट, बिदर या जिल्ह्यांत रोज रुग्ण आढळून येत आहेत. बंगळुरूच्या पाच भागांत १४ दिवसांसाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. बंगळुरूमध्ये रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या घरात आहे.

Web Title: CoronaVirus News: Bangalore closed for 20 days: Kumaraswamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.