विमान प्रवासासाठी बुकिंग उद्यापासून सुरू होणार; सुरुवात ग्रीन झोनमध्ये, नियम मात्र कडक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 12:14 AM2020-05-17T00:14:46+5:302020-05-17T00:15:23+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : १२ मे रोजी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी १८ मेपासून लागू करण्यात येणारा लॉकडाऊन आधीच्या पेक्षा वेगळा असेल, असे सांगत काही सवलती देण्याचे संकेत दिले होते.

Coronavirus News : Bookings for air travel will start from tomorrow; In the beginning green zone, however, the rules are strict | विमान प्रवासासाठी बुकिंग उद्यापासून सुरू होणार; सुरुवात ग्रीन झोनमध्ये, नियम मात्र कडक

विमान प्रवासासाठी बुकिंग उद्यापासून सुरू होणार; सुरुवात ग्रीन झोनमध्ये, नियम मात्र कडक

Next

नवी दिल्ली : देशातील सगळ्याच विमान कंपन्यांनी बुकिंग एजन्सींना १८ मेपासून तिकीट बुकिंग सुरू करण्यास सांगितले आहे. विमान वाहतूक मंत्रालयानेही लॉकडाऊननंतर विमान सेवा सुरू करण्याबाबत कंपन्या आणि विमानतळांकडून याबाबत सूचना मागविल्या आहेत.
१२ मे रोजी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी १८ मेपासून लागू करण्यात येणारा लॉकडाऊन आधीच्या पेक्षा वेगळा असेल, असे सांगत काही सवलती देण्याचे संकेत दिले होते.
ग्रीन झोनमध्ये असलेल्या शहरांदरम्यान ही सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिथे गेले १४ दिवस कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही, असा परिसर ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केला जातो; परंतु विमान सेवा सुरू करताना संसर्गा$पासून बचावासाठी काही नियम अधिक कडक केले आहेत. याबाबत एका विशेष पथकाने दिल्ली विमानतळाला भेट देऊन तयारीची पाहणी केली.

Web Title: Coronavirus News : Bookings for air travel will start from tomorrow; In the beginning green zone, however, the rules are strict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.