CoronaVirus News: मी देशासाठी मरतो, पण माझ्या पत्नीला उपचार मिळेनात; BSF जवानाचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 11:30 AM2021-04-21T11:30:02+5:302021-04-21T11:37:53+5:30
CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह पत्नीला उपचार मिळेनात; बीएसएफ जवानाची वणवण भटकंती
रिवा: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ९५ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशातील अनेक राज्यांमधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. रुग्ण नातेवाईकांसह रुग्णालयांबाहेर उपचारांसाठी प्रतीक्षा करत आहेत. मात्र त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. मध्य प्रदेशातल्या रिवा जिल्ह्यातील एका जवानाचा व्हिडीओ समोर आला आहे. सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. जवान आपल्या पत्नीला घेऊन वणवण फिरत आहे. मात्र बेड मिळत नाही.
देशातील ऑक्सिजनचा साठा गेला कुठे?; मोदी सरकारचा निर्णय पाहून तुम्हालाही धक्का बसेल
बीएसएफ जवान कोरोनाग्रस्त पत्नीला घेऊन कारमधून एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरत आहे. आठ तासांपासून त्याची वणवण सुरू आहे. पत्नीला कुठे दाखल करावं, याची माहिती कोणीही जवानाला देत नाहीए. येणाऱ्या जाणाऱ्यांकडे जवान मदत मागत आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींकडे त्यानं आपली व्यथा मांडली. त्यानंतर काही माध्यम प्रतिनिधींनी त्याला मदत केली. त्यानंतर त्याच्या पत्नीला संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
तब्बल ५०० कोरोना रुग्णांचा जीव होता संकटात; अखेरच्या काही मिनिटांत घडला चमत्कार
चार दिवसांपूर्वीच परतला जवान
पत्नीला कोरोनाची लागण झाल्यानं त्रस्त असलेला जवान अवघ्या चारच दिवसांपूर्वी घरी परतला. त्याआधी तो त्रिपुरामध्ये कर्तव्य बजावत होता. जवानानं कोरोनाची लस घेतली आहे. तो घरी आल्यावर पत्नीची प्रकृती बिघडली. तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मंगळवारी सकाळी पत्नीला रुग्णालयात दाखव करण्यासाठी त्याची वणवण सुरू होती. मात्र अनेक रुग्णांमध्ये जाऊनही त्याला मदत मिळाली नाही. पत्नीला कारमध्ये ठेवून तो प्रत्येक रुग्णालयात जाऊन विचारणा करत होता. मात्र त्याच्या पदरी निराशाच पडली.
'मुन्नाभाई'लाही लाजवेल अशी वेळ; कोरोना रुग्ण बेड घेऊन हॉस्पिटलबाहेर आला
कोरोनाबाधित पत्नीला उपचार मिळत नसल्यानं, बेड उपलब्ध होत असल्यानं जवान अतिशय हतबल झाला होता. माध्यम प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्याला अश्रू अनावर झाले. 'आजारी पत्नीला घेऊन मी भटकत आहे. तिला कुठे उपचार मिळतील? तिला मी कुठे दाखल करू? मी देशासाठी मरतो. पण माझ्या पत्नीला उपचार मिळत नाहीएत,' असं म्हणत जवानानं आक्रोश केला. मध्य प्रदेशातल्या अनेक शहरांमध्ये सध्या अशीच स्थिती आहे.