CoronaVirus News: सामूहिक संसर्ग नसल्याचा केंद्राचा दावा हास्यापद; विषाणूतज्ज्ञांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:24 PM2020-07-20T22:24:14+5:302020-07-21T06:37:32+5:30

कोरोनाबद्दलचे धोरण पारदर्शक नाही; सामूहिक संसर्ग नक्कीच अस्तित्वात आहे

CoronaVirus News: Central goverment claims no mass infection ridiculous; Criticism of virologists | CoronaVirus News: सामूहिक संसर्ग नसल्याचा केंद्राचा दावा हास्यापद; विषाणूतज्ज्ञांची टीका

CoronaVirus News: सामूहिक संसर्ग नसल्याचा केंद्राचा दावा हास्यापद; विषाणूतज्ज्ञांची टीका

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या ११ लाखांवर पोहोचली असतानाही देशात सामूहिक संसर्ग नसल्याचा केंद्र सरकार करीत असलेला दावा खोटा व हास्यास्पद आहे, असा आरोप काही विषाणूतज्ज्ञ व आरोग्यतज्ज्ञांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर केला आहे. देशात काही दिवसांपूर्वीच सामूहिक संसर्गाला सुरुवात झाली असल्याचा या शास्त्रज्ञांचा दावा आहे.

लक्षद्वीप वगळता देशाच्या प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचे रुग्ण सध्या सापडत आहेत. कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात होण्याच्या टप्प्यापर्यंत या साथीचा अद्याप फैलाव झालेला नाही, असे केंद्र सरकारचे मत आहे. यासंदर्भात शास्त्रज्ञांनी सांगितले की, सरकारचा दावा हास्यास्पद असून सामूहिक संसर्ग नक्कीच अस्तित्वात आहे. मात्र, ही वस्तुस्थिती मान्य करण्याची सरकारची तयारी नाही.

एखाद्या साथीचा इतक्या मोठ्या प्रमाणात फैलाव होतो की, कोणामुळे कोणाला संसर्ग झाला हे ओळखणेही कठीण होते. अशा अवस्थेला सामूहिक संसर्ग असे म्हणतात. संसर्गाचा मूळ स्रोत व त्याची साखळी शोधणे शक्य होत नाही. विदेशातून परतलेल्या नागरिकांमुळे भारतात कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली.

विदेशातून आलेल्या व्यक्तीने कुठे कुठे प्रवास केला होता, त्याची माहिती तपासली जात होती. मात्र, आता एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर तो कोरोना रुग्णाच्या निकट संपर्कामुळे किंवा रुग्णाच्या निकट संपर्कात असलेल्या व्यक्तीमुळे तिसऱ्या व्यक्तीला झाला आहे का, याची तपासणी केली जाते. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण देशातील फक्त ४९ जिल्ह्यांमध्ये आढळून येतात. भारतात ७३३ जिल्हे आहेत. त्यामुळे सामूहिक संसर्ग अद्याप सुरू झालेला नाही हेच या आकडेवारीवरून दिसून येते, असा दावा केंद्र सरकारने नुकताच केला होता. मात्र, खासगी संस्थांमध्ये काम करणाºया विषाणूतज्ज्ञांपैकी काही जणांना हा दावा मान्य नाही.

सरकारी आकड्यांतूनच मिळतात पुरावे

देशात सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचे पुरावे सरकारी आकड्यांतूनच आढळून येतात, असेही एका विषाणूतज्ज्ञाने सांगितले. केंद्र सरकारचे कोरोना साथीविषयीचे धोरण पारदर्शक नाही. जगातील इतर देशांपेक्षा भारताची स्थिती अतिशय वाईट आहे, असे आमचे म्हणणे नाही; पण सामूहिक संसर्ग अस्तित्वातच नाही, असे केंद्र सरकारने सांगणे अतिशय चुकीचे आहे, असे एका शास्त्रज्ञाने म्हटले आहे.

लसीची प्रतीक्षा संपली? ‘द लैंसेट’च्या संपादकांचे ट्विट

च्संपूर्ण जगाला ज्या लसीची प्रतीक्षा आहे त्या कोरोनावरील लसीची प्रतीक्षा संपल्याचे ट्विट ‘द लैंसेट’या वैद्यकीय नियतकालिकाचे संपादक रिचर्ड होर्टन यांनी केले आहे. या ट्विटबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. च्रिचर्ड होर्टन यांनी टष्ट्वीट केले आहे की, ‘उद्या, व्हॅक्सिन. फक्त सांगत आहे.’ या टष्ट्वीटबाबत खूपच चर्चा होत आहे. असेही सांगितले जात आहे की, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून विकसित व्हॅक्सिनच्या परिणामाबाबत मोठी घोषणा आता कधीही होऊ शकते.

जगात सध्या अनेक कंपन्या व्हॅक्सिनची चाचणी करीत आहेत. चिनी कंपनी सिनोवॅक्स बायोटेक चाचणीच्या तिसºया टप्प्यात जाण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी दुसºया- तिसºया टप्प्यात, तर आफ्रिका-ब्राझिलमध्ये चाचणी तिसºया टप्प्यात आहे. जर्मन कंपनी बिनोटेक फायजरसोबत व्हॅक्सिन तयार करीत आहे. भारतात दोन लसी मानव परीक्षणाच्या टप्प्यात आहेत.

Web Title: CoronaVirus News: Central goverment claims no mass infection ridiculous; Criticism of virologists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.