CoronaVirus News : चेन्नईमध्ये पोलिसांनी लोकांच्या हालचालींवर ठेवली ड्रोनद्वारे नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 02:17 AM2020-06-21T02:17:32+5:302020-06-21T02:21:02+5:30
CoronaVirus News : लोकांनी विनाकारण रस्त्यांवर फिरू नये म्हणून पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स उभारले आहेत तसेच लोकांच्या हालचालींवर ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली जात आहे.
चेन्नई : कोरोना संसर्गाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी चेन्नईमध्ये शुक्रवारी सकाळपासून लॉकडाऊनची अधिक कडक स्वरूपात अंमलबजावणी सुरू झाली असून ती ३० जूनपर्यंत कायम असणार आहे. लोकांनी विनाकारण रस्त्यांवर फिरू नये म्हणून पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स उभारले आहेत तसेच लोकांच्या हालचालींवर ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली जात आहे.
चेन्नई शहरातील अनेक रस्ते व पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. शुक्रवारी चेन्नईतील रस्त्यांवर शुकशुकाट होता तसेच काही रस्त्यांवर तुरळक वाहने धावत होती. त्यात जीवनावश्यक सेवांशी निगडित वाहनांची संख्या अधिक होती. या शहरामध्ये पोलिसांनी २८० ठिकाणी तपासणी चौक्या उभारल्या आहेत. चेन्नईच्या सीमेवरील तपासणी नाक्यांवरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. येणाऱ्या-जाणाºया प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे ई-पास आहे अशांनाच चेन्नईत येण्यास किंवा तिथून बाहेर जाण्यास पोलीस परवानगी देत आहेत. (वृत्तसंस्था)