CoronaVirus News : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण छत्तीसगड, केरळ, तेलंगणात सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 12:05 AM2020-05-17T00:05:59+5:302020-05-17T00:06:36+5:30
coronavirus News in Marathi and Live Updates : भारतामध्ये ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्यांचा आकडा गुरुवारी (दि. १४) ८० हजारांपार गेला असून, आता एक लाखाच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे.
- अमोल मचाले
पुणे : भारतामध्ये ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्यांचा आकडा गुरुवारी (दि. १४) ८० हजारांपार गेला असून, आता एक लाखाच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. ही स्थिती चिंताजनक असली, तरी ५० पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या राज्यांचा विचार करता, ८ राज्यांत अर्ध्यापेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याबाबतीत छत्तीसगड, केरळ आणि तेलंगणा ही राज्ये पहिल्या ३ क्रमांकावर आहेत.
गुरुवारपर्यंत देशात एकूण ८१ हजार ९८९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी २७ हजार ९६९ म्हणजे ३४.११ टक्के रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. २ हजार ६४९ नागरिकांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ३.२३ टक्के इतके आहे. राज्यांचा विचार करता, छत्तीसगडमध्ये एकूण ५९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ५६ बरे झाले असून हे प्रमाण देशात सर्वाधिक म्हणजे तब्बल ९४.९१ टक्के इतके आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या केरळमध्ये ५६१ रुग्णांपैकी ४९३ जण म्हणजे ८७.८८ टक्के नागरिक उपचारानंतर बरे झाले आहेत. तेलंगणामध्ये ६७.३३ टक्के रुग्ण (१,४१४ पैकी ९५२) बरे झाले आहेत. या ३ राज्यांसह उत्तराखंड (६४.१०), राजस्थान (५८.१८), आंध्र प्रदेश (५४.०६), हरियाणा (५३.६७) आणि उत्तर प्रदेश (५३.१०) येथेही निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. रुग्णसंख्येत पहिल्या ३ क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र, तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. महाराष्ट्रात २२.०१, तमिळनाडूत २३.१५, तर गुजरातमध्ये ३९.१३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत हे प्रमाण ३५.९५ टक्के इतके आहे.
पश्चिम बंगाल, गुजरात आणि मध्य प्रदेशात मृत्यूदर ५ पेक्षा जास्त नोंदला गेला आहे. बंगालमध्ये आढळलेल्या २ हजार ३७७ रुग्णांपैकी २१५ म्हणजे ९.०४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात हा मृत्यूदर
सर्वाधिक आहे. त्यानंतर गुजरातमध्ये ६.११ तर, मध्य प्रदेशात ५.३५ टक्के मृत्यूदर आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण ३.७० टक्के इतके आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण छत्तीसगड, केरळ, तेलंगणात सर्वाधिक
- अमोल मचाले।