CoronaVirus News : मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची आज होणार कोरोना टेस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 09:38 AM2020-06-09T09:38:06+5:302020-06-09T09:47:15+5:30
CoronaVirus News : अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीची बातमी समजताच अनेक नेत्यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीत कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांनीही स्वत:ला आयसोलेट केले आहे. तसेच, अरविंद केजरीवाल यांची आज कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.
अरविंद केजरीवाल यांची गेल्या रविवार (दि.7) पासून प्रकृती बिघडल्याचे समजते. त्यांना ताप आणि खोकल्याच्या त्रास जाणवत आहे. रविवारी दुपारपासून अरविंद केजरीवाल यांनी आपल्या बैठका रद्द केल्या आहेत. तसेच, ते कोणालाही भेटले नसून त्यांनी स्वत: ला आयसोलेट केले आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीची बातमी समजताच अनेक नेत्यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. नवी दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदर्श गुप्ता आणि जुने मित्र कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दुसरीकडे, दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीत आतापर्यंत 29 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर मृतांचा आकडा आठशेच्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत दिल्ली सरकारने दावा केला आहे की येत्या 15 दिवसांत बेडची संख्या दुप्पट होईल.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : 'हा' देश झाला कोरोनामुक्त, पंतप्रधानांनी केला डान्स!
सिंथिया डी रिची आणि वादाचं जुनं नातं; बेनझीर भुट्टो यांच्यावरही आक्षेपार्ह भाष्य केलं होतं
ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांनी कोरोना नियम मोडले, तर बॉसला होणार तुरुंगवास!
अमेरिकेत सर्वात मोठी आर्थिक मंदी येणार, अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती