CoronaVirus News: दिल्लीतील २३.४८ टक्के लोकांत आढळली कोरोना अँटीबॉडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 11:24 PM2020-07-21T23:24:27+5:302020-07-22T06:41:32+5:30

दिल्लीतल ७७ टक्के लोक कोरोना संक्रमणापासून दूर आहेत. ही चांगली बाब असली तरी कोरोनापासून दूर राहण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

CoronaVirus News: Corona antibody found in 23.48 per cent people in Delhi | CoronaVirus News: दिल्लीतील २३.४८ टक्के लोकांत आढळली कोरोना अँटीबॉडी

CoronaVirus News: दिल्लीतील २३.४८ टक्के लोकांत आढळली कोरोना अँटीबॉडी

Next

नवी दिल्ली : दिल्लीत २६ जून ते ४ जुलैपर्यंत करण्यात आलेल्या सिरो-सर्व्हेचा अहवाल आला असून, दिल्लीतील २३.४८ टक्के लोक कोरोना संक्रमित झाले आहेत व त्यांच्यात कोरोनाची अँटीबॉडी मिळाली आहे, हे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे (एनसीडीसी) संचालक डॉ. सुजितकुमार सिंह यांनी सांगितले की, ज्या लोकांमध्ये अँटीबॉडी विकसित झाली आहे, ते प्रबळ प्रतिकारशक्तीमुळे ते कोरोना संक्रमित होतील किंवा ते कोरोनापासून सुरक्षित आहेत, हे आताच सांगणे अवघड आहे. याबाबत सध्या अभ्यास सुरू आहे.

कोरोना राष्ट्रीय टास्क फोर्सचे चेअरमन व नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे की, दिल्लीतल ७७ टक्के लोक कोरोना संक्रमणापासून दूर आहेत. ही चांगली बाब असली तरी कोरोनापासून दूर राहण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

संक्रमित आढळण्याचे प्रमाण आले ९ टक्क्यांवर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे ओएसडी राजेश भूषण यांनी म्हटले आहे की, दिल्लीत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिंताजनक स्थिती होती. दररोज ९ हजार ते ९.५ हजार चाचण्या घेतल्या जात होत्या. त्यात ३७ टक्के लोक पॉझिटीव्ह आढळत होते.

च्स्थिती सुधारण्यासाठी पथक तयार केले होते. यात नॅशनल टास्क फोर्सचे चेअरमन डॉ. व्ही. के. पॉल, एम्स संचालक डॉ. रणदीप गुलेरिया व आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांचा समावेश होता.च्त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी चाचण्या वाढवण्याचा तसेच कंटेन्मेंट झोन बनवून उपचार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे स्थिती सुधारली व जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दररोज २५ हजार चाचण्या घेतल्या व पॉझिटीव्हीटीचे प्रमाण ९ टक्क्यांवर आले.

Web Title: CoronaVirus News: Corona antibody found in 23.48 per cent people in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.