CoronaVirus News: कोरोनामुळे रिटेल व्यापाऱ्यांचे ९ लाख कोटी रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 11:14 PM2020-05-26T23:14:46+5:302020-05-26T23:14:56+5:30
शात असलेल्या ६० दिवसांच्या लॉकडाऊन काळात रिटेल क्षेत्रातील व्यापाºयांचे ९ लाख कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले.
नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांत रिटेल व्यापाऱ्यांचे ९ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याची माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) दिली आहे.
मागील सोमवारपासून देशातील लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात सूट मिळाली आहे. त्यामुळे दुकाने सुरू झाली असून काही प्रमाणात दैनंदिन व्यवहार पूर्ववत होत आहेत. गेल्या सप्ताहात रिटेल व्यावसायिकांचा केवळ पाच टक्के व्यापार झाला असून ८ टक्के कर्मचारी दुकानावर काम करण्यासाठी येत असल्याचे कॅटने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
देशातील किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रामध्ये ७ कोटी व्यापारी कार्यरत असून त्यांच्याकडून दरवर्षी सुमारे ५० लाख कोटी रुपयांचा व्यवहार होत असतो. या क्षेत्रामध्ये ४० कोटी व्यक्ती या उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहेत.
देशात असलेल्या ६० दिवसांच्या लॉकडाऊन काळात रिटेल क्षेत्रातील व्यापाºयांचे ९ लाख कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. यामुळे केंद्र तसेच राज्य सरकारांना दीड लाख कोटी रुपयांच्या जीएसटीच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले, अशी माहिती कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीया व राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी पत्रकारांना दिली.